मुक्तपीठ टीम
राज्यात विशेषतः मुंबईत लसीकरणाचा बोगसपणा झाल्याचे प्रकरण समोर आल्याने एसआयटीमार्फत तपास करण्यात येत आहे मात्र केंद्राने राज्याला अंधारात ठेवल्याने ही घटना घडल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
लसीकरणाचा बोगसपणा होण्याचे मुख्य कारण खासगी लोकांना व खाजगी हॉस्पिटल यांना लस वितरीत करण्यात आली. त्याची माहिती राज्यांना देण्यात आलेली नाही किंवा डाटा राज्याला शेअर करण्यात आलेला नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
सुरुवातीपासून जर खासगी लोकांना लस देत असताना राज्यांना माहिती दिली असती तर नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक यंत्रणा आहेत त्या यंत्रणा त्यावर नियंत्रण ठेवू शकल्या असत्या आणि अशाप्रकारचा बोगसपणा झाला नसता असा, टोला नवाब मलिक यांनी केंद्रसरकारला लगावला आहे.