मुक्तपीठ टीम
सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच सीआयएसएफने सहाय्यक उप निरीक्षकांच्या भरती जाहीर केली आहे. या पदांवर लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम (एलडीसीई) या परीक्षेद्वारे भरती करण्यात येणार आहेत. ६९० पदांसाठी ही भरती आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच हेड कॉंस्टेबल / जीडी कॉंस्टेबल / ट्रेड्समॅनच्या अशा पाच पदांवर पाच वर्षे कामाचा अनुभव असणारे उमेदवारही भाग घेऊ शकतात.
या परीक्षेसाठी उमेदवारांचे कमाल वय ३५ वर्षे निश्चित केले गेले आहे. मात्र अनुसूचित जाती / जमातीच्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेमध्ये सवलत आहे. उमेदवारांची निवड सर्विस रेकॉर्ड, लेखी परीक्षा, शारीरिक मानक चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.
अर्ज करण्यासाठी, उमेदवारास अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडून सीआयएसएफच्या संबंधित जोनल डीआयजीकडे ५ फेब्रुवारी २०२१ पूर्वी पाठवावीत. अधिक माहितीसाठी, सीआयएसएफच्या अधिकृत वेबसाइट cisf.gov.in वर तपासू शकता.
पाहा व्हिडीओ :