मुक्तपीठ टीम
पालघर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था सातत्यानं कार्यरत असते. या संस्थेमार्फत कोकणातील अनेक गावांमध्ये सामाजिक, आरोग्य, शेतीविषयक, महिला सक्षमीकरण आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. गेल्या काही दिवसात ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक वाचनालयं स्थापन करण्यात आली आहेत.
ग्रामीण मातीतील माणसं अधिकारीपदावर पोहचलीत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या उद्देशानं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे कोकणात सामाजिक कार्य अविरतपणे करत आहेत. कोकणात अनेक ठिकाणी यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी मोफत वाचनालयांची सुरुवात करण्यात आलीय. त्या अभियानाचा एक भाग म्हणून मुरबाड तालुक्यात वाचनालयांचे उद्घाटन करण्यात आले. त्यातील एक धसई येथे खास लोकाग्रहास्तव सुरु झालंय. या स्पर्धा परीक्षा वाचनालयाचा उदघाटन समारंभ जिजाऊ संस्था ठाणे जिल्हाप्रमुख सौ. मोनिकाताई पानवे-सांबरे यांच्या हस्ते पार पडला. त्या प्रसंगी संदीप तरे, सरपंच मंगलाताई असवळे, काशिनाथ भोईर, वाळकोळी गुरुजी, पवार सर, अजित भोईर सर, विभागप्रमुख एकनाथ भोईर, अजित जाधव, सज्जन जमदरे, सूरज सुरोशे, प्राध्यापक निवृत्ती मगर, नवनाथ वाघेरे, गणेश सांबरे, अभिजीत शिंदे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना जिजाऊ संस्था ठाणे जिल्हाप्रमुख सौ. मोनिकाताई पानवे-सांबरे यांनी जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या उद्दिष्टांचीही आठवण करुन दिली.
जिजाऊचा ध्यास, कोकणाचा विकास!
- कोणाचीही कोणतीही मदत न घेता स्वबळावर, स्वकमाईतून समाजसेवा
- समाजातील प्रत्येकाचं सर्वार्थानं सक्षमीकरण
- “शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि कृषि विकास” हीच सक्षमीकरणाची पंचसुत्री
- पालघर जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी, ग्रामीण पट्ट्यात मोफत पाच सीबीएसई शाळा चालवल्या जात आहेत.
- ग्रामीण भागात दृष्टीहीन दिव्यांगांसाठी खास मोफत शाळा.
- पालघर जिल्ह्यात जिल्हा सरकारी रुग्णालय नाही, अनेकदा आरोग्य आणीबाणी उद्भवल्यास मुंबई-ठाणे-नाशिकच नाही तर गुजरातकडेही धाव घ्यावी लागते.
- प्रत्येकाला मिळालीच पाहिजे चांगली आरोग्य सेवा. नव्हे तो हक्कच. यासाठी जिजाऊकडून दुर्लक्षित भागांमध्ये रुग्णालय, रुग्णवाहिका, आरोग्य शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया.
- राजकारण एके राजकारण नाही तर प्रशासनातही असावा सामान्य माणूस, कोकणातील युवापिढीसाठी यूपीएससी, एमपीएससी, पोलीस स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण
- खेळाच्या मैदानात कसा राहणार कोकणी माणूस मागे…त्यासाठीच क्रीडा प्रशिक्षणही मोफत! मेहनत आणि गुणवत्ता तुमची, साथ जिजाऊची! आजवर कबड्डी, कुस्ती आणि मॅरेथॉन स्पर्धेत जिजाऊच्या खेळाडूंची पदकांची लयलूट
- सामान्य माणसाचा स्वाभिमान जपण्यासाठी स्वयंरोजगारासाठी जिजाऊची साथ
- कोकणातील नैसर्गित साधनसंपत्तीचा उपयोग करत उद्योगविकासासाठी प्रयत्न
- कोकणातील जास्त पावसाला ‘साठवत, जिरवत, उन्हाळ्यातही पुरवत’ जलसंधारणातून कृषि विकास.
- कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा विकास हाच ध्यास