Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विठुरायाच्या पंढरपुरात गजानन महाराजांच्या शेगावसारखं आनंद सागर उद्यान

June 30, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
anand sagar

मुक्तपीठ टीम

पंढरपूर कोट्यवधी विठूभक्तांचे श्रद्धास्थान. विठुरायाला नजरेत सामावून पारणे फिटतात. त्याच पंढरीचं सौंदर्य वाढवण्यासाठी आता विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मांडली आहे. तीर्थक्षेत्र शेगाव मधील ‘आनंद सागर’ प्रमाणे भव्य उद्यान पंढरपूरमध्ये साकारण्याची त्यांची कल्पना आहे. त्यांनी उद्यान उभे करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा असे निर्देश पंढरपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.
पंढरपूर शहरातील विकासकामे व श्री विठ्ठल मंदिराच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी डॉ गोऱ्हे यांनी ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, मुख्याधिकारी अरविंद माळी, पत्रकार सुनील उंबरे यांनी सहभाग घेतला.

 

पंढरपुरात आनंद सागर कशासाठी?

• पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थळ आहे.
• दरवर्षी लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येतात.
• दर्शनानंतर त्यांना क्षणभर विरंगुळा घेण्यासाठी एक प्रसन्न, प्रशस्त आणि शांत जागा असायला हवी.
• शेगावमध्ये ‘आनंद सागर’ हे सुंदर उद्यान उभारले आहे.
• पंढरपूरमध्ये असे एक उद्यान असायला हवे नगरपरिषदेने अशा उद्यानासाठी तातडीने एक प्रस्ताव सादर करावा असे निर्देश डॉ गोऱ्हे यांनी दिले.

 

भारतीय पुरातत्व विभागाकडे प्रलंबित असलेल्या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जोशी यांनी मंदिराशी निगडित श्री विठ्ठल मूर्तीचे संवर्धन, रखडलेला स्कायवॉक, परिवार देवता आणि मंदिरातील डागडुजी याविषयी झालेल्या कामांची माहिती यावेळी दिली. लॉकडाऊनपूर्वी घेतलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या विशेष बैठकीमुळे लॉकडाऊन काळात मंदिर समितीला मंदिरातील अनेक कामे करता आली याबद्दल श्री जोशी यांनी डॉ गोऱ्हे यांचे आभार व्यक्त केले. मंदिराच्या रखडलेल्या कामांना गती मिळाल्याबद्दल डॉ.गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त करीत उर्वरित कामाबाबत लवकरच पुरातत्व विभागाची बैठक बोलावणार असल्याचे सांगितले.

पंढरपुरातील रस्त्यांचाही प्रश्न मार्गी लावणार

• प्रांताधिकारी ढोले यांनी पालखी मार्गावरील रस्त्यांचा मुद्दा उपस्थित केला.
• देहू-आळंदी ते वाखरी या पालखी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे तथापि, वाखरी ते पंढरपूर या मार्गाबाबतचा निर्णय प्रलंबित आहे.
• हे काम तातडीने होणे गरजेचे आहे.
• वाखरी ते सरगम चौक आणि सरगम चौक ते अर्बन बँक उड्डाण पूल केल्यास वारी काळात वाहतुकीची कोंडी होणार नाही.
• या कामाबाबत केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी यांचेकडे पाठपुरावा करुन कामाला मंजुरी व निधीची उपलब्धता व्हावी, अशी विनंती ढोले यांनी केली.
• त्यावर डॉ गोऱ्हे यांनी याबाबत लवकरच गडकरी यांचेकडे बैठक लावून कामाचा पाठपुरावा करु, असे सांगितले.

 

पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माळी यांनी चंद्रभागा नदीत जाणारे ड्रेनेजचे पाणी बंद केले असल्याचे स्पष्ट केले. प्रदक्षिणा मार्गाचे काँक्रिटिकरण करणे, नामसंकीर्तन कामासाठी निधीची उपलब्धता, प्रदक्षिणा मार्ग आदी विषय उपस्थित केले. यावर डॉ गोऱ्हे यांनी यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.
पत्रकार उंबरे यांनी प्रदक्षिणा मार्गाचे कॉक्रीटीकरण, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रलंबित प्रश्न, दर्शन रांगेचा अर्धवट स्कायवॉक, सार्वजनिक शौचालय, चंद्रभागा नदीतीरावरील घाट, शहरातील रस्ते आदी कामांकडे डॉ.गोऱ्हे यांचे लक्ष वेधले.

 

वरील सर्व मुद्द्यांवर सर्वंकष चर्चा झाल्यानंतर डॉ गोऱ्हे यांनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पंढरपूर दौरा करणार असल्याचे सांगितले. यावेळी चर्चा झालेल्या कामांचा आढावा व पाहणी या दौऱ्यात करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Dr.Neelam GorheNitin Gadkariआनंद सागर उद्यानपंढरपूरमहाराष्ट्रशेगावसचिन ढोले
Previous Post

गजानन महाराजांच्या शेगावचं आनंद सागर उद्यान आहे तरी कसं?

Next Post

भारतीय तरुणीनं शोधला मायक्रोसॉफ्ट-फेसबूकमधील बग, २२ लाखाचं बक्षीस

Next Post
aditi singh

भारतीय तरुणीनं शोधला मायक्रोसॉफ्ट-फेसबूकमधील बग, २२ लाखाचं बक्षीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!