मुक्तपीठ टीम
बिहारचे माजी पोलीस संचालक गुप्तेश्वर पांडे पदावर असतानाही प्रवचनं देण्यासारखेच बोलत असत. आता पोलीस दलातून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केलेल्या पाडेंना तिथं काहीच न लाभल्यानं राम राम सुचलंय. त्यांनी आता धर्म-अध्यात्माच्या मार्ग स्विकारला आहे आणि ते रामकथा सांगणारे बाबा बनले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर पांडे यांचं नाव चर्चेत आलं होतं. विशेषतः मुंबई पोलीस व अभिनेत्री रिया चक्रवर्तीबद्दल पांडे यांनी केलेल्या विधानावरून त्यांचं नाव वादात सापडलं होतं. आता त्यांनी त्या उद्गारांबद्दल रिया चक्रवर्तीची माफी मागितली आहे.
पोलीस महासंचालकपदी असताना पांडे यांनी रिया चक्रवर्तीबद्दल तिची लायकी काढणारी कमेंट केली होती. ती वादाचा विषय ठरली होती. आता त्यावर ते म्हणतात की त्यांना आता पश्चाताप होतो. पण त्यांना औकात म्हणजे कद (उंची) म्हणायचे होते.
गुप्तेश्वर पांडेंबाबांचं सुशांत कांड
• अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपविली होती.
• त्यावेळी बिहारचे डीजीपी असलेले गुप्तेश्वर पांडे म्हणाले होते की हा न्यायाचा विजय आहे.
• रिया चक्रवर्ती यांच्या कुटुंबियांच्या वतीने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर केलेल्या वक्तव्याविषयी ते म्हणाले होते की नितीश यांना काहीही बोलण्याची त्यांची औकात नाही आहे.
• नितीशकुमार यांच्या पाठिंब्याने सुशांतच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची आशा आहे, असाही दावा त्यांनी डीजीपी असतानाही केला होता.
डीजीपी असताना राजकीय प्रवचन…आता अयोध्येत कथा वाचन!
• गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पांडे बिहारच्या डीजीपीपदावरून निवृत्त झाले.
• त्यांना निवडणूक लढवायची होती.
• त्यांना बक्सर मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवावायची होती.
• जनता दलाचे कार्यकर्ते तयारी करत होते, पण शेवटच्या क्षणी त्यांना तिकीट मिळू शकले नाही.
• आता पुन्हा राजकारणातून त्यांनी धर्म-अध्यात्माच्या मार्ग स्विकारला आहे.
• पांडे सध्या अयोध्येत कथावाचन करत आहेत.
सौ सौ चुंहे खाके बिल्ली हजको चली अशी म्हण आहे. पण बिल्लीचा मूळ स्वभाव जाणार नाही. हल्ली प्रवचन सांगणाऱ्या ढोंगी बाबांची कमी नाही. त्यात आणखीन एकाची भर एव्हढेच.