मुक्तपीठ टीम
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एनएसडीसी आणि व्हॉट्सअॅपने एकत्रिपणे डिजिटल स्कील चॅम्पियनशिप प्रोग्राम आयोजित केला आहे. भारतातील तरुणांमध्ये डिजिटल कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्या कौशल्यांच्या बळावर येत्या काळात ते रोजगारासाठी सक्षम होतील. या कार्यक्रमात शाळेतील आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात डिजिटल ऑनलाइन कौशल्य शिकवले जाईल. यासह व्हॉट्सअॅप व एनएसडीसी डिजीटल स्कील चॅम्पियन्सना प्रमाणपत्र दिले जाईल.
हा कोर्स मॉड्यूल बेस्ड असेल. यात ऑनलाइन इकोसिस्टम आणि इतर विशेष माहिती दिली जाणार आहे. हा उपक्रम ५ राज्यांत ५० कॅम्पससह सुरू करण्यात आला आहे. या ५ राज्यांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकचा समावेश आहे. व्हॉट्सअॅपची भागीदार असणारी कंपनी इंफीस्पार्कच्या माध्यमातून हे होईल.
तरुणांना मदत करेल
एनएसडीसीने डिजिटलची व्याप्ती सतत वाढत असल्यामुळे व्हर्च्युअल लर्निंग कार्यक्रमातून कौशल्य विकसित करण्यासाठी योजना आखली. अशा कौशल्यांमुळे तरुण कामावर गेले तर त्यांना त्याबद्दल माहिती असावी.
कसा चालणार प्रशिक्षण कार्यक्रम?
• व्हॉट्सअॅप प्रशिक्षण सत्र आयोजित करणार आहे.
• व्हॉट्सअॅप बिझिनेसच्या माध्यमातून पंतप्रधान कौशल्य केंद्राबाबत सांगितले जाईल.
• छोट्या व्यवसायात उद्योजक होण्यासाठी प्रवृत्त करण्यात येईल.
• व्हॉट्सअॅपवर १.५ कोटी बिझिनेस अॅप यूजर आणि जागतिक स्तरावर ५० कोटी यूजर आहेत. ते तयार ग्राहक मिळतील.