मुक्तपीठ टीम
इलेक्ट्रिक दुचाकी म्हटलं की प्रदूषणापासून मुक्ती. त्यात पुन्हा सध्या डिझेल पेट्रोल महागाईचा भडका उडाला असल्यानं प्रत्येकालाच वाटतं की इलेक्ट्रिक टू व्हिलर विकत घ्यावी. पण आतापर्यंत या गाड्या महाग असल्यानं शक्यतो अनेक ग्राहक त्या विकत घेणे टाळत असत. आता मात्र, एक चांगली बातमी आहे. सरकारने फास्टर अॅडॉप्शन अॅन्ड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल या योजनेंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकीवरील जीएसटी कमी केला आहे. त्यामुळे त्यांची किंमत २८ हजारांवर आली आहे. पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी दर १२ टक्के होता. तो आता ५ टक्के करण्यात आला आहे. यामुळे इलेक्ट्रिक दुचाकींच्या किंमती २८ हजारांपर्यंत खाली आल्या आहेत.
कोणाचे किती कमी झाले दर
१. टीव्हीएस आयक्यूब
या दुचाकीचे दर ११,२५० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यानंतर आता टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटर १,००,७७७ रुपयांमध्ये खरेदी करू शकतो. जी यापूर्वी १,१२,०२७ रुपये होती. टीव्हीएसची बॅटरीवर चालणारी ही स्कूटर ४.४ किलोवॅट इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज आहे.
२. रिव्होल्ट आरव्ही ४००
आरव्ही ४०० ही रिव्होल्ट मोटर्स कंपनीची पहिली इलेक्ट्रिक बाईक आहे. आरव्ही ४०० हा टॉपचा व्हेरिएन्ट आहे तर, आरव्ही ३०० हा बेस व्हेरिएन्ट आहे. कंपनीने आरव्ही ४०० ची किंमत सुमारे २८,२०० रुपयांनी कमी केली आहे. पहिल्या रिव्होल्ट आरव्ही ४०० मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ९०,७९९ रुपये होती. जी आता ६२,५९९ होईल. कंपनीने रिव्होल्ट आरव्ही ४०० दुचाकीमध्ये ५ किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन राईडिंग मोड आहेत. रिव्होल्ट आरव्ही ४०० दुचाकीसह कंपनी ८ वर्षांपर्यंत किंवा १.५ लाख किमी पर्यंतची वॉरंटी देते.
३. ओकिनावा आय-प्रेझ+
कंपनीने ओकिनावा आय-प्रेझची किंमत १.१५ लाख रुपये होती. परंतु यामध्ये ७,२०० रुपयांवरून १७,९०० रुपयांपर्यंत किंमत घसरली आहे. यामुळे त्याची किंमत १,०७,८०० वरून ९७,१०० वर गेली आहे. कंपनीने ग्लोसी रेड ब्लॅक, ग्लॉसी गोल्डन ब्लॅक, ग्लॉसी सिल्वर ब्लॅक कलर्समध्ये ओकिनावा आय-प्रेझ इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. यासाठी स्वतंत्र अॅपही तयार केला गेला आहे. ओकिनावा, इको अॅप गूगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करता येईल.
४. हीरो फोटॉन एचएक्स
हीरो फोटॉन एचएक्सची किंमत ७९,९४० रुपये होती. सब्सिडी मिळाल्यानंतर त्याची किंमत ७१,४४९ रुपये झाली आहे. यामुळे किंमतीत १२% पर्यंत घट झाली आहे. यात डिजिटल स्पीडोमीटर, अँटी-थेफ्ट अलार्मसह रिमोट लॉक, कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टम, एलईडी लाइटिंग आणि मोबाइल फोन चार्जिंगसाठी यूएसबी पोर्टही मिळतो.
५. हीरो ऑप्टिमा ईआर (डबल बॅटरी)
हीरो ऑप्टिमा ईआरची किंमत ७८,६४० रुपये एक्स-शोरूम किंमत होती. यात सब्सिडी मिळाल्यानंतर किंमत ३३% खाली आली आहे. आता ही स्कूटर ५८,९८० रुपयात उपलब्ध आहे. यात ड्युअल लिथियम-आयन बॅटरी आहे. स्कूटरमधील बॅटरी ५ वर्षांपर्यंत राहील. एलईडी हेडलाइट्स, डिजिटल स्पीडोमीटर, अलॉय व्हील्स, टेलिस्कोपिक सस्पेंशन अशी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. हिरो ऑप्टिमा ईआर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आणि कार्यालयीन प्रवासासाठी जास्त प्रमाणात वापरली जाते.