Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

छोट्या शहरातील तरुणीचा विश्वविक्रम, पोलिसांनाही शिकवला सायबर क्राइम

June 29, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
Kamakshi

मुक्तपीठ टीम

गाझियाबादची कामाक्षी शर्मा हिची आज जगभरात चर्चा होत आहे. सायबर क्राईम रोखण्यासाठी लोकांना जागरूक करण्याची कामगिरी तिने बजावली आहे. त्याचवेळी ५० हजार पोलीस कर्मचार्‍यांना सायबर क्राइमचं प्रशिक्षणही तिने दिलं आहे. त्यामुळे कामक्षीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. सन २०१९ मध्ये तिने जम्मू ते कन्याकुमारीपर्यंत एक महिन्याची मोहीम राबवून आयपीएससह अनेक पोलीस कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले होते.

Kamakshi

कामाक्षीचे नाव यापूर्वीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. गाझियाबादमध्ये ओल्ड पंचवटी कॉलनीत राहणारी कामक्षी शर्माने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. यानंतर तिने २०१७ मध्ये गढवाल विद्यापीठातून संगणक विज्ञान विषयात बीटेक केले. ती सायबर क्राइममधील तज्ज्ञ आहे. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर नोकरी न शोधता सायबर फसवणुकीपासून वाचविण्यासाठी तिने देशभर जनजागृती करण्याची मोहीम सुरू केली.

Kamakshi

कामाक्षी छोटं शहर, मोठं काम!

• कामाक्षीचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला आहे.
• वडील रघु शर्मा दिल्लीत खासगी नोकरी करतात.
• आई ममता शर्मा गृहिणी आहे.
• विशेष म्हणजे तिने २०१९ मध्ये ९ सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत कोणत्याही संघटनेशी संबंधित न राहता जम्मूपासून प्रवास सुरू केला.
• जम्मू ते पंजाब, चंदीगड असा प्रवास हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात करत १३ ऑक्टोबर रोजी कन्याकुमारी येथे संपला.
• कामाक्षीने सायबर गुन्हेगारीची माहिती ५० हजार पोलीस कर्मचाऱ्यांना दिली.

Kamakshi

प्रशिक्षणासाठी परदेशातून बोलावणे

१. प्रशिक्षणासाठी परदेशातून आमंत्रणे येत आहेत.

२. काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेत प्रशिक्षण दिले.

३. याशिवाय इतर देशांकडूनही कॉल येत आहेत.

४. तसेच, युरोपमधील बर्‍याच देशांमध्ये सायबर गुन्ह्याबाबत काम केले गेले आहे.

५. सायबर गुन्ह्याविरूद्ध पहिली जनजागृती भारत देशातच करण्यात आली आहे.

Kamakshi

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Kamakshi Sharmaकामाक्षी शर्मागाझियाबादवर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसायबर गुन्हे
Previous Post

मुंबईत हायटेक ट्रॅक, मेट्रो धावणार, लगतच्या इमारतींना हादरे नसणार!

Next Post

इलेक्ट्रिक टू व्हिलर्सचे अच्छे दिन…आता ८ ते २८ हजारांपर्यंत स्वस्त!

Next Post
electric

इलेक्ट्रिक टू व्हिलर्सचे अच्छे दिन...आता ८ ते २८ हजारांपर्यंत स्वस्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!