Tuesday, June 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात सुधारणा

१ जुलै २०२१ पासून नवीन दर लागू होणार

June 28, 2021
in सरकारी बातम्या
0
MINOR MINERAL

मुक्तपीठ टीम

गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. येत्या १ जुलै २०२१ पासून नवीन दर लागू होणार असल्याचे महसूल व वन विभागाने कळविले आहे.

 

बांधकाम साहित्य म्हणून वापरण्यात येणारा चुना तयार करण्यासाठी भट्ट्यांमध्ये वापरण्यात येणारी चुनखडी व शिंपल्यापासून केलेल्या चुन्याचा दर आता ६०० रुपये प्रति ब्रास असणार आहे. उत्खननाद्वारे किंवा गोळा करुन काढलेले सर्व दगड आणि दगडाच्या भुकटीचा दर सुध्दा आता ६०० रुपये प्रति ब्रास असणार आहे.

 

बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांभा दगडाचा (लॅटराईट स्टोन) दर १५० रुपये प्रति ब्रास असेल. उत्खननाद्वारे काढलेले किंवा गोळा केलेले गोटे, बारीक खडी, मुरुम, कंकर यांचा दर ६०० रुपये प्रति ब्रास असेल. केवळ बॉलमिल्सच्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येणारे चॅल्सेडोनी खडे यांचा दर ३००० रुपये प्रति ब्रास असणार आहे.

 

सिरामिक किंवा मृतिकाशिल्पे तयार करण्याच्या प्रयोजनार्थ, धातूशास्त्रीय प्रयोजनार्थ, दृष्टिविषयक प्रयोजनार्थ, कोळसा खाणीमध्ये साठवून ठेवण्याच्या प्रयोजनार्थ, सिल्व्हीक्रेट सिमेंट तयार करण्यासाठी आणि मातीची भांडी आणि काच सामान तयार करण्यासाठी वापरण्यात न येणारी सर्वसामान्य वाळू यांचा दर मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राकरिता १२०० रुपये प्रति ब्रास तर मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र वगळून इतर क्षेत्राकरिता ६०० रुपये प्रति ब्रास असणार आहे.

 

कौले (मंगलोरी किंवा अन्य कोणत्याही प्रयोजनाची) तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी चिकणमाती, अंतर्गत बंधारे, रस्ते, लोहमार्ग आणि इमारती यांचे बांधकाम करताना भरणा करण्यासाठी/भूपृष्ठ सपाट करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी माती, बांधकामाचे साहित्य म्हणून वापरण्यात येते त्यावेळी पाटीचा दगड किंवा नरम खडक या सर्वांचा दर ६०० रुपये प्रति ब्रास असणार आहे.

 

विटा तयार करण्याच्या आणि इतर प्रयोजनासाठी वापरण्यात येणारी साधी माती, गाळ आणि सर्व प्रकारची चिकणमाती इत्यादी याचा दर २४० रुपये प्रति ब्रास असणार आहे. फुलरची माती किंवा बेटोनाईट याचा दर १५०० रुपये प्रति ब्रास असेल. सजावटीच्या प्रयोजनासाठी वापरावयाचे इतर सर्व प्रकारचे दगड (ग्रॅनाईट वगळून) याचा दर ३००० रुपये प्रति ब्रास असेल. इतर सर्व गौण खनिज (ग्रॅनाईट वगळून आणि केंद्र शासनाने १० फेब्रुवारी २०१५ अन्वये घोषित केलेली गौण खनिजे वगळून) दर ६०० रुपये प्रति ब्रास असेल. गौण खनिजे (ग्रॅनाईट वगळून आणि केंद्र शासनाने १० फेब्रुवारी २०१५ अन्वये घोषित केलेली गौण खनिजे वगळून) दर ९००० प्रति हेक्टर किंवा त्याच्या भागासाठी असेल.

 


Tags: MINOR MINERALगौण खनिजमहाराष्ट्र
Previous Post

“दररोज पंधरा लाख लसीकरणाची शासनाची तयारी”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

बृहन्मुंबई हद्दीत २४ जुलैपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश

Next Post
Mumbai police

बृहन्मुंबई हद्दीत २४ जुलैपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!