मुक्तपीठ टीम
जून महिन्याच्या अखेरपर्यंत बँकांची अनेक महत्वपूर्ण कामं उरकून घेण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही सिंडिकेट बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला या महिन्याच्या अखेरपर्यंत नवीन IFSC कोड घ्यावा लागेल. तसंच या महिन्यात तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करावी लागेल. विशेष म्हणजे अनेक बँकांच्या विशेष एफडी योजनांचा लाभ ३० जूनपर्यत घेतला जाऊ शकतो.
पीएम किसान योजनेसाठी करा नोंदणी
जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर ३० जूनपूर्वी नोंदणी नक्की करा. जेणेकरुन यावर्षीचे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यावर येऊ शकतील. पीएम किसान सन्मान निधीच्या नियमांनुसार जूनपर्यंत नोंदणी केल्यास जुलै आणि ऑगस्टमध्ये तुमच्या खात्यावर २००० रुपयांप्रमाणे ४००० हजार रुपये जमा होतील.
अधिक व्याजासाठी विशेष एफडी योजना
SBI, HDFC, ICICI बँक ऑफ बडोदा या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरु केली होती. ही योजना ३० जून २०२१ पर्यंतच आहे. या योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना सामान्य एफडी योजनांच्या तुलनेत अधिक व्याज मिळत आहे.
सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना नवा IFSC कोड घ्यावा लागेल
सिंडिकेट बँक ही १ एप्रिल २०२० पासून कॅनरा बँकेत विलीन झाली आहे. त्यामुळे १ जुलैपासून बँकेचे IFSC कोड बदलले जाणार आहेत. त्यामुळे सिंडीकेट बँकेच्या शाखा सध्या अस्तित्वात असलेल्या IFSC कोडनुसार ३०जूनपर्यंतच कामकाज करणार आहेत. त्यामुळे सिंडीकेट बँकच्या ग्राहकांना आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन नवा IFSC कोड घ्यावा लागेल.