उदयराज वडामकर
जे अशक्य वाटत होतं तेच कोल्हापुरातील डॉक्टरांनी कौशल्यानं शक्य करून दाखवलं आहे. कोरोनातून बरे झाल्यावर काहींना ग्रासणाऱ्या म्युकर मायकॉसिस म्हणजेच काळ्या बुरशीच्या तिसऱ्या टप्प्यातील रुग्णाच्या ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये तीन ब्लॉकेज होते. खरंतर त्या अवस्थेत रुग्णावर कोणतीही शस्त्रक्रिया करणे सोपे नसते. पण कोल्हापूर मधील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय सीपीआर हॉस्पिटलचे अक्षय बाफना आणि त्यांच्या टीमने त्या वृद्ध रुग्णावर यशस्वीरीत्या अँजिओप्लास्टी केली.
• कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमधील डॉ अक्षय बाफना व टीमने ही कामगिरी बजावली.
• म्युकर मायकोसिसपीडित असलेल्या वृद्धावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
• रुग्णाची तपासणी केली असता त्याला तीन ब्लॉकेजेस आढळून आले.
• त्या रुग्णाचे हृदय फक्त तीस टक्के कार्यरत होते.
• त्यावर तातडीने उपाय करणे गरजेचे होते.
• सामान्यत: किमान ६० टक्के हृदयाची हालचाल असायला पाहिजे.
• संसर्गाचा धोका असल्याने शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याने लक्षात आले.
• त्यामुळे डॉक्टर अक्षय बाफना व टीमने आधी शस्त्रक्रियेचे नियोजन केले.
• तीन ब्लॉकेज असलेल्या धमण्यांसाठी तीन स्टेंटचा वापर करून शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
• ही शस्त्रक्रिया काळा बुरशीच्या रूग्णावरील असल्याने खूपच गुंतागुंतीची होती. तरीही या टीमने कौशल्याने पार पाडली.
म्युकर मायकॉसिसच्या तिसऱ्या टप्प्यातील रुग्ण
• आजरा तालुक्यातील तो रुग्ण कोरोनामुक्त झाला होता.
• या वृद्धाला म्युकर मायकोसिसचा संसर्ग झाला होता.
• त्याला असलेला म्युकर मायकोसिस हा तिसऱ्या टप्प्यातील होता.
• वय आणि संसर्ग आणि त्याचवेळी ब्लॉकेजेस यामुळे खूपच गुंतागुंत होती.