मुक्तपीठ टीम
मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात २६ पैशांनी तर डिझेलच्या दरात ७ पैशानी वाढ झाली आहे. राज्यांतील काही प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल प्रति लीटर १०३.८९ रुपयांवर तर डिझेल प्रति लीटर ९५.७९ रुपयांवर पोहचले आहे.
देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
• दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लीटर ९७.७६ रुपये तर डिझेल प्रति लीटर ८८.३० रुपये
• कोलकत्तामध्ये पेट्रोल प्रति लीटर ९७.६३ रुपये तर डिझेल प्रति लीटर ९१.१५ रुपये
• चेन्नईमध्ये पेट्रोल प्रति लीटर ९८.८८ रुपये तर डिझेल प्रति लीटर ९८.८८ रुपये
• लखनऊमध्ये पेट्रोल प्रति लीटर ९४.९५ रुपये तर डिझेल प्रति लीटर ८८.७१ रुपये
• पटनामध्ये पेट्रोल प्रति लीटर ९७.९५ रुपये तर डिझेल प्रति लीटर ९३.६३ रुपये
कसे वाढतात दर?
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत डीलर कमिशन, एक्साईज ड्यूटी आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याचे दर जवळजवळ दुप्पट होतात.
दररोज बदलणारे दर कसे जाणून घ्याल
• इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आरएसपीसह आपल्या शहराचा कोड टाइप करा आणि 9224992249 नंबरवर एसएमएस पाठवा.
• प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो.
• आपण हे आयओसीएल वेबसाइटवरूनही तपासू शकता.