मुक्तपीठ टीम
कोरोनाची लस सर्व पात्र नागरिकांना मोफत देण्याचा नवा टप्पा सोमवारपासून देशभरात सुरु झाला. नव्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी या लसीकरण मोहिमेत विक्रमी यश मिळालं आहे. भारताने सुमारे ८० लाख ९५ हजार ३१४ लाख लोकांना लसींच्या मात्रा दिल्या. त्यामुळे नव्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी भारताने नवा विक्रम नोंदवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात जून रोजी या लसीकरण मोहिमेच्या नव्या टप्प्याची घोषणा केली होती. देशभरात कोरोना लसीकरण मोहिमेची व्याप्ती आणि गती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. लसींची उपलब्धता वाढवणे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध होणाऱ्या लसींची आगावू माहिती देणे, जेणेकरून त्यांना पुढचे नियोजन सुव्यवस्थितपणे आखता येईल. आणि लस पुरवठा साखळी अधिक सुनियोजित करणे अशा उपायांतून लसीकरण मोहिमेला आणखी गती देण्यात आली.
लस पुरवठ्याचे प्रमाण वाढते
• मे महिन्यात देशभरात कोविड लसीकरणासाठी ७ कोटी ९० लाख लसींच्या मात्रा उपलब्ध होत्या.
• जून महिन्यात ही संख्या ११ कोटी ७८ लाख मात्रांपर्यंत वाढवण्यात आली.
• यात केंद्र सरकारकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत दिल्या जाणाऱ्या लसींचा तसेच खाजगी रुग्णालयांकडून थेट खरेदी करण्यात आलेल्या लसींचाही समावेश आहे.
केंद्राकडून आगाऊ माहितीमुळे चांगले नियोजन
• राज्यांना जून महिन्यात दिल्या जाणाऱ्या लसींच्या संख्येविषयी त्यांना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून आगाऊ माहिती देण्यात आली होती.
• या आगाऊ माहितीमुळे राज्यांना आपल्या जिल्हानिहाय तसेच कोविड लसीकरण केंद्रांवर दिल्या जाणाऱ्या लसींचे योग्य नियोजन करता आले.
• यामुळे, देशभरात, लसीकरण कार्यक्रमाला गती मिळाली
पंतप्रधानांकडून लसीकरण विक्रमाबद्दल आनंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विक्रमी संख्येने झालेल्या लसीकरणाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.आणि यासाठी आघाडीवरील कोरोनायोद्ध्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमांची प्रशंसा केली आहे.
ट्विटमध्ये पंतप्रधान काय म्हणालेः
”आज विक्रमी संख्येने झालेल्या लसीकरणाबद्दल आनंद आहे. कोविड -19.विरोधात लढण्यासाठी लस हे आपले सर्वात सामर्थ्यशाली अस्त्र आहे. ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यांचे अभिनंदन आणि बहुतांश नागरिकांना ही लस मिळावी हे सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने कठोर परिश्रम घेणाऱ्या आणि आघाडीवर काम करणार्या सर्व कोरोनायोद्ध्यांचे कौतुक.
वेल डन इंडिया ! ”
खालील तक्त्यात, आज देण्यात आलेल्या लसींच्या मात्रांची राज्य निहाय सविस्तर आकडेवारी आहे.
राज्य / केंद्रशासित प्रदेश
आज
अंदमान निकोबार बेटे
783
आंध्र प्रदेश
47328
अरुणाचल प्रदेश
12892
आसाम
330707
बिहार
470352
चंदीगड
6738
छत्तीसगड
84638
दादरा आणि नगर हवेली
4176
दिल्ली
76216
गोवा
15586
गुजरात
502173
हरियाणा
472659
हिमाचल प्रदेश
98169
जम्मू-काश्मीर
32822
झारखंड
82708
कर्नाटक
1067734
केरळा
261201
लडाख
1288
लक्षद्वीप
289
मध्य प्रदेश
1542632
महाराष्ट्र
378945
मणिपूर
6589
मेघालय
13052
मिझोरम
17048
नागालँड
9745
ओडिशा
280106
पुडुचेरी
17207
पंजाब
90503
राजस्थान
430439
सिक्किम
11831
तामिळनाडू
328321
तेलंगणा
146302
त्रिपुरा
141848
उत्तर प्रदेश
674546
उत्तराखंड
115376
पश्चिम बंगाल
317991
दमण आणि दीव
4374
एकूण
80,95,314