मुक्तपीठ टीम
अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या जमीन खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याच्या आरोपांनंतर वातावरण तापलेले असतानाच आता स्थानिक महंतही आक्रमक झाले आहेत. अयोध्येचे संत तपासाच्या बाजूने आहेत. निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट भंग करून दोषींच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच मंदिरातील संपत्ती वाया घालवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंबंधी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमीत शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ते पत्र पाठवणार आहेत.
निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी म्हटलंय की, “भगवान श्री रामलल्ला यांची फसवणूक केली जात आहे. दानपेटीत जे काही पैसे आले ते देवाच्या मंदिराच्या बांधकामासाठी आले आहेत. पण राम मंदिर ट्रस्टमध्ये सहभागी लोक व्यापारी आहेत. अयोध्येत कोट्यवधींची जमीन कधी विकली नाही. परंतु आज ही माणसे कोट्यवधी रुपयांची जमीन विकत घेऊन पैसे वाया घालवत आहेत. म्हणूनच ही ट्रस्ट ताबडतोब बंद करावी. मी पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. या जागेच्या खरेदीतल्या साक्षीदारांच्या मालमत्तेचीही चौकशीही व्हायला हवी. त्यांना ताबडतोब अटक करा.”
महंत धर्मदास पंतप्रधान मोदींना पाठवणार पत्र
- अयोध्येत ५० हून अधिक घरे आणि जमीनी खरेदी केल्या गेल्या आहेत.
- ट्रस्टच्या अध्यक्षांनासुद्धा या सर्व प्रकरणाची माहिती देण्यात आलेली नाही.
- श्री रामलल्ला अयोध्येच्या जनतेचे आहेत.
- ट्रस्ट सरचिटणीस चंपतराय यांच्यासह अन्य लोकांनी राजीनामा द्यावा.
- धर्मदास म्हणाले की, ट्रस्टचे लोकांची चौकशी आणि कारवाईसाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पत्र पाठवले जाईल.