मुक्तपीठ टीम
गेले कित्येक वर्ष टिटवाळ्यातील इंदिरानगर परीसरातील स्मशानभूमी बकाल अवस्थेत होती. सद्यस्थितीत नुतनीकरण झालेल्या स्मशानभूमीत दोन रॅकसहित खूपच सुंदर असे आरसीसी बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, आजूबाजूचा परिसर खूपच ओसाड असल्याने खूपच भकास वाटत असे. त्यामुळे स्थानिकांनीच या परिसराचे श्रमदानातून सुशोभीकरण सुरुवात केली आहे.
टिटवाळा एज्युकेशनल कल्याणकारी फाऊंडेशनचे अध्यक्ष व शिवसैनिक विजय देशेकर यांच्या संकल्पनेतून हे काम सुरु झाले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रमदानातून सुशोभीकरणाचा शुभारंभ झाला आहे. या परिसरात दर रविवारी नागरिक श्रमदान करुन तब्बल १००० झाडे लावणार आहेत. या सामाजिक उपक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी वस्तूरुपी म्हणजे सिमेंट, विट, पत्रा, लोखंड अशा विविध स्वरूपात मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शुभारंभासाठी आमदार विश्वनाथजी भोईर, स्थानिक माजी नगरसेवक संतोष तरे, उपशहरप्रमुख किशोर शुक्ला, शाखाप्रमुख ज्ञानेश्वर मढवी, प्रशांत मोहिते, मोरे काका व परिसरातील श्रमदान करणारे अनेक नागरिक उपस्थित होते.