मुक्तपीठ टीम
राज्यात चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी २० फुटांवर पोहोचली आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहिल्यास पंचगंगा नदीच्या पाण्याची धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे.कोल्हापूरातील राजाराम बंधाऱ्यासह एकूण १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोल्हापूरात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे कोल्हापूरच्या वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. गडहिंग्लज, चंदगड राज्य महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते देखील बंद झाले आहेत.