Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रवीण दरेकरांची खोचक टीका, संभाजी छत्रपतींचे आंदोलन मुख्यमंत्र्यांची वेळ मिळण्यासाठी?

June 16, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
pravin darekar

मुक्तपीठ टीम

 

आज कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी संभाजी छत्रपतींच्या नेतृत्वात मराठी क्रांती मूक आंदोलन पार पडले. दरम्यान भाजपाने खासदार संभाजी छत्रपती यांनी काढलेल्या मराठा मूक आंदोलनावर टीका केली आहे.केवळ मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता का?, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

 

खासदार संभाजीराजे छत्रपती परवा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. कोल्हापुरातील मूक आंदोलनाची सांगता झाल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीत संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती दिली आहे. प्रवीण दरेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना टीका केली.

 

संभाजी छत्रपती यांचा सर्व पक्षांनी आणि नेत्यांनी सन्मानच केल आहे. सर्व नेत्यांनी आंदोलन स्थळी त्यांच्या भूमिका मांडल्या. पण या आंदोलनात भूमिका मांडून मार्ग निघाला का? प्रत्यक्षात मार्ग काढण्यासाठीचं ते व्यासपीठ नव्हतंच, असं प्रवीण दरेकर म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आंदोलन स्थळी आले असते तर मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेऊ शकले असते. परंतु आंदोलनाची सुरुवात म्हणून या विषयी संवाद झाला, यातून काय निष्पन्न होत आहे? मुख्यमंत्री चर्चेसाठी वेळ देणार आहे, मग केवळ चर्चेची वेळ मिळावी यासाठी हे आंदोलन होतं का?, अशी टीका त्यांनी केली आहे.

 

टेक्नॉलॉजीची गरज नाही-

  • मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्तीची गरज आहे, असं सांगितले जाते. हे सांगण्यासाठी आंदोलन केलं होतं का? या सर्व गोष्टी सर्वांना माहीत आहे, असं ते म्हणाले.
  • मराठा समाजाच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने जे निर्णय घेतले होते, ज्या तरतूदी केल्या होत्या.
  • तशाच प्रकारचा निर्णय हा आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत घेतला पाहिजे.
  • त्यासाठी कोणत्याही टेक्नॉलॉजी किंवा विज्ञानाची गरज नाहीये, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

एका मिनिटात आरक्षण आणलं असते-

  • मराठा आरक्षणासाठी ज्या प्रक्रिया करणं गरजेचं आहे, त्या न करता केंद्राने आरक्षणाचा तिढा सोडवावा अशी मागणी करणं याला काही अर्थ नाही.
  • ते इकतं सोप्पं असतं तर देवेंद्र फडणवीस किंवा आम्ही केंद्र सरकारकडे जाऊन एका मिनिटात आरक्षण आणलं असतं.
  • मागासवर्ग आयोग स्थापन करून राज्यशासनाकडून राज्यपाल आणि राज्यपालांकडून केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे अहवाल जाणं आवश्यक आहे.
  • या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील.
  • मात्र, या प्रक्रिया पूर्ण करण्यावर कोणीच बोलत नाही.
  • वरवरचं बोलून केंद्रावर सर्व ढकलण्याचा प्रयत्न सुरू असून ते योग्य नाही, असं दरेकर म्हणाले.

 


Tags: BJPcm uddhav thackerayMaratha Reservationpravin darekarsambhaji chhatrapatiप्रवीण दरेकरभाजपमराठा आरक्षणमराठा मूक आंदोलनमुख्यमंत्री उद्धव ठाकरेसंभाजी छत्रपती
Previous Post

“महाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य”: उदय सामंत

Next Post

हाताला सलाईनच्या सुईसह शिवसेना खासदार धैर्यशील माने मराठा आंदोलनात!

Next Post
dhairysheel mane

हाताला सलाईनच्या सुईसह शिवसेना खासदार धैर्यशील माने मराठा आंदोलनात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!