Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विसाव्या शतकातील बहुचर्चित ‘सव्यसाची’ ‘स्टोरीटेलच्या’ ऑडिओबुकमध्ये!

‘सव्यसाची’ गोष्ट ऐका अभिनेत्री सीमा देशमुख यांच्या स्पष्ट आवाजात स्टोरीटेल ऑडिओबुकमध्ये!

June 16, 2021
in प्रेस रिलिज
0
savyasachi

मुक्तपीठ टीम

आजच्या आधुनिक काळातील आघाडीचे प्रतिभावंत लेखक संजय सोनवणी यांची विसाव्या शतकातील अखेरच्या दशकात भारताने काय काय अनुभवले याचे यथार्थ दर्शन घडविणारी ‘सव्यसाची’ ही बहुचर्चीत सामाजिक कादंबरी ‘स्टोरीटेल मराठी’ने नव्या ऑडिओबुकमध्ये खास साहित्यरसिक श्रोत्यांसाठी आणली आहे. त्या काळातल्या वास्तवावर आधारित कल्पनांचा सुरेख अनुभव या कादंबरीमध्ये आला असून माफिया टोळ्यांमुळे निर्माण झालेल्या या काळातील वर्तमानातल्या सामाजिक जीवनाचे चित्र नाट्यात्मक व गतिमानतेने अचूक साधले गेल्याने ‘स्टोरीटेल’च्या या ऑडिओबुकमध्ये अभिनेत्री सीमा देशमुख यांच्या स्पष्ट आवाजात ऐकताना श्रोते तल्लीन होतात.

 

‘सव्यासाची’ या कादंबरीत विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकाने नेमके काय काय भोगले याची गाथा कथन करण्यात आली आहे. नवी अर्थव्यवस्था आणि त्या अनुषंगाने ढवळली गेलेली जुनी व्यवस्था आणि मूल्ये राजकारणाचा झालेला अध:पात आणि गुन्हेगारीकरण, धार्मिक तेढ वाढवत त्याचा धंदा करणारे दलाल आणि यासोबत असहाय्यपणे या नव्या वातावरणाशी जुळवत, नवी स्वप्ने पहात फरफटत जाणारा संभ्रमित समाज याचे विराट दर्शन या महाकाय कादंबरीत घडते. सर्वव्यापकता एवढेच काही या कादंबरीचे वैशिष्ट्ये नाही. या परिवर्तनाच्या काळात सामील झालेल्या सर्वच भल्याबुऱ्या पात्रांचे, त्यांच्या जीवनाचे आणि घटनांचे चित्रण अत्यंत सहृदयतेने लेखक संजय सोनवणी यांनी केल्याने ती स्टोरीटेलवर ऑडिओबुकमध्ये ऐकताना साहित्यरसिक श्रोते दंग होतात. एकाच प्रवाहात कोमलता, कारुण्य आणि नृशंसता यांचा मिलाफ साधताना सर्वच घटनांची सर्वांगीण मिमांसाही केली असल्याने तटस्थ सहृदयतेचेही दर्शन घडविण्याची किमया या कादंबरीत लेखकाने साधली गेली आहे. ‘सव्यसाची’च्या रुपात विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकातील वर्तमानाचा आरसा दाखिविला गेला आहे.

 

savyasachi

‘सव्यसाची’ ही प्रसिद्ध सामाजिक कादंबरी लिहिणारे प्रख्यात लेखक संजय सोनवणी हे मराठी साहित्यविश्वातील आधुनिक काळातले महत्त्वाचे साहित्यिक, तत्वज्ञ, कवी आणि संशोधक आहेत. त्यांनी मानवी जीवनाच्या असंख्य पैलूंना विविध साहित्यप्रकाराद्वारे हात घालत विपुल साहित्य रचना केली आहे. वर्तमानातील सामाजिक प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचं लेखन नैतिक समस्यांबद्दलचे तसेच आधुनिक परिप्रेक्षात वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेले चिंतनपर असून त्यांच्या बौद्धिक आणि तात्विक उंचीचा परिचय करून देते. त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्याला नवी परिमाणे मिळवून दिली आहेत.

 

मराठी साहित्यविश्वात इतिहास घडविणारी ही लोकप्रिय कादंबरी ऐकण्यासाठी आपल्याला ‘स्टोरीटेल’ डाउनलोड करावे लागेल. ‘स्टोरीटेल’द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्या रसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. दरमहा फक्त रू. २९९/- मध्ये मराठी, इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्स किंवा दरमहा फक्त रू.१४९/- मध्ये, मराठी पुस्तके ‘सिलेक्ट मराठी’ योजनेत मिळतात. ऑडिओबुक्स कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात.

 


Tags: seema deshmukhSTORYTELअभिनेत्री सीमा देशमुखऑडिओबुक्सलेखक संजय सोनवणीसव्यसाची सामाजिक कादंबरीस्टोरीटेलस्टोरीटेल मराठी
Previous Post

अमेरिकेच्या कृषी विभागासोबत स्मार्ट पिकांसाठी महाराष्ट्राचा करार

Next Post

संभाजी छत्रपतींच्या रणनीतीला यश, सर्वपक्षीय नेत्यांचे मराठा आरक्षणाला समर्थन!

Next Post
maratha (2)

संभाजी छत्रपतींच्या रणनीतीला यश, सर्वपक्षीय नेत्यांचे मराठा आरक्षणाला समर्थन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!