Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्विटरला भारतात मोठा धक्का, सरकारने दर्जा बदलला, आता प्रत्येक ट्विटसाठी थेट जबाबदारी!

ट्विटरने केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स स्वीकारल्या

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
twitter (2)

मुक्तपीठ टीम

२८० शब्दांमध्ये अभिव्यक्तीची शक्ती देणाऱ्या ट्विटरला भारतात मोठा धक्का बसला आहे. ट्विटरने भारताच्या आयटी नियमांचे पालन करण्यास उशीर केल्याने कंपनीची इंटरमीडिएट प्लॅटफॉर्मचा दर्जा संपुष्टात आणला आहे. याचा अर्थ असा की आता ट्विटरवर केलेल्या प्रत्येक ट्विटची जबाबदारी पब्लिशर म्हणून ट्विटरची असेल. सरकारच्या या कडक पावलाची बातमी आली असतानाच ट्विटरने मंगळवारी नव्या नियमांमुसार आवश्यक अधिकाऱ्याची नेमणूक करतानाच सरकारला सर्व काही अधिकृतरीत्या कळवणार असल्याचे जाहीर केले.

 

ट्विटरवर आता प्रत्येक ट्विटची थेट जबाबदारी

  • माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार ट्विटरवर आता थेट जबाबदारी असेल.
  • आतापर्यंत ट्विटरला विभिन्न वापरकर्त्यांकडून पोस्ट केल्या जाणाऱ्या कन्टेंटचा एक होस्टिंग प्लॅटफॉर्म मानला जात असे.
  • आता ट्विटर आता त्याच्या व्यासपीठावर प्रकाशित केलेल्या पोस्टसाठी थेट जबाबदार असेल.
  • याचा अर्थ असा आहे की जर ट्विटरवर कथित बेकायदेशीर सामग्रीचा आरोप असेल तर मध्यस्थ म्हणून नव्हे तर प्रकाशक म्हणून कारवाईस सामोरे जावे लागेल.
  • ट्वीटसाठी ट्विटरवर फौजदारी कारवाई होऊ शकेल, जशी अन्य प्रकाशकांवर होते. याचा अर्थ आजवर मध्यस्त प्लॅटफॉर्म म्हणून असणारे संरक्षण उरलेले नाही.

दरम्यान ट्विटरने नरमाईची भूमिका घेत, मंगळवारी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्सनुसार अंतरिम मुख्य तक्रार अधिकारी नियुक्त केल्याचे कळवले आहे. यासंबंधित तपशील ट्विटर लवकरच केंद्र सरकारला देणार आहे.

 

ट्विटरकडून भारतातील सर्व आयटी नियम पालन

  • ट्विटर भारत सरकारच्या नव्या गाईडलाईन्सचे पालन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल
  • ट्विटर यासंदर्भात कोणतीही पावले उचलत आहे, त्याची माहिती सतत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला दिली जाईल.
  • गेल्या आठवड्यातच ट्विटरने नोडल कॉन्टॅक्ट पर्सन आणि रेसिडेन्ट ग्रेव्हान्स अधिकारी यांना करारावर नियुक्त केले आहे.
  • लवकरच या पदांवर कायमस्वरुपी नियुक्ती केली जाईल.

 

फेसबूकनेही मानले नवे आयटी नियम

  • नव्या गाइडलाइन्सचे अनुसरण करून फेसबुकने देशात तक्रार अधिकारी नेमला आहे.
  • एफबीने आपल्या वेबसाइटवर तंटा निवारण अधिकारी स्पूर्ती प्रिया यांचे नाव प्रकाशित केले आहे.
  • एफबीने असे म्हटले आहे की यूजर ई-मेलद्वारे स्पूर्तीशी संपर्क साधू शकतात.
  • या व्यतिरिक्त, वापरकर्ते फेसबुक इंडियामध्ये पोस्टद्वारे देखील त्यांच्या तक्रारी पाठवू शकतात.

फेसबुक व्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅपनेही आपल्या वेबसाईटवर ग्रेव्हान्स ऑफिसर म्हणून परेश बी लाल यांचे नाव प्रसिद्ध केले होते.


Tags: FacebookIndiaIT Rulenew guidelinestwitterwhatsappआयटी नियमट्विटरनव्या गाईडलाईन्सफेसबूकव्हॉट्सअॅप
Previous Post

“मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावाने चंदा हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा” : सचिन सावंत

Next Post

एका दिवसात ३ लाख २३ हजार कुटुंबांना मिळाले हक्काचे छत

Next Post
uddhav thackeray

एका दिवसात ३ लाख २३ हजार कुटुंबांना मिळाले हक्काचे छत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!