मुक्तपीठ टीम
सून असावी तर अशी! सहजच ओठी येतं. आज मुक्तपीठ ज्या सुनेची सत्यकथा सांगतेय ती सून आहेच तशी. सध्या एक छायाचित्र खूप व्हायरल होत आहे. एक महिला एका पुरुषाला पाठीवर घेऊन जात असल्याचे ते छायाचित्र आहे. आसाममधील नागाव येथे राहणाऱ्या २४ वर्षांच्या निहारिका दास यांचे. छायाचित्रात त्या आपल्या कोरोना पॉझिटिव्ह सासऱ्यांना पाठीवर घेऊन जाताना दिसत आहे. निहारिका तिच्या सासऱ्यांना पाठीवर घेऊन जवळजवळ २ किमी चालली. यादरम्यान लोकांनी फोटो काढले पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. निहारिकाने धोका पत्करत सासऱ्यांना रुग्णालयात पोहचवले. मात्र, इतके प्रयत्न करूनही निहारिका आपल्या सासऱ्यांना वाचवू शकली नाही. तिचे सासरे थुलेश्वर दास यांचा मृत्यू झाला. पण छायाचित्रांमुळे निहारिका जगभर चर्चेत आली. ते छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर लोक आता निहारिकाला आदर्श सून म्हणत आहेत. प्रत्येकाच्या ओठी येतंच येतं…शाबास सुनबाई!
सूनबाईची भन्नाट कहाणी
• निहारिका दास या आसाममधील नगावला राहतात.
• २ जून रोजी निहारिकाचे सासरे थुलेश्वर दास यांना कोरोनाची लक्षणे आढळली. थुलेश्वर राहा परिसरातील भाटिगाव येथील सुपारी विक्रेता होते.
• त्यांची तब्येत खराब झाली असता, सून निहारिकाने त्यांना २ किमी दूर राहाच्या आरोग्य केंद्रात नेण्यासाठी रिक्षाची व्यवस्था केली.
• रिक्षा घरा पर्यंत येऊ शकेल असा कोणता रस्ता नाही आहे.
• तिच्या सासर्यांची अवस्थाही चालण्यास योग्य नव्हती.
• निहारिकाचा नवरा कामासाठी सिलीगुडी येथे राहतो.
• अशा परिस्थितीत सासऱ्यांना पाठीवरून घेऊन जाण्याशिवाय तिला पर्याय नव्हता. तिने तिच्या सासर्यांना पाठीवर घेऊन रिक्षा स्टँडवर नेले.
निहारिकाला एक ६ वर्षाचा मुलगा आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार त्रास येथेच संपला नाही. आरोग्य केंद्रात सासऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. सासऱ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत डॉक्टरांनी त्यांना २१ किमी अंतरावर नागावच्या कोरोना रुग्णालयात नेण्यास सांगितले. तसेच त्यांना आरोग्य केंद्रातून रूग्णवाहिका किंवा स्ट्रेचर देण्यात आले नाही. त्यानंतर त्यांनी खासगी कारची व्यवस्था केली. यासाठीसुद्धा तिला सासर्यांना पाठीवरुन लांब पळत घेऊन जावे लागले. लोक बघत होते, परंतु कोणीही मदत केली नाही. सासऱ्यांना उचलण्यासाठी तिला मानसिक आणि शारीरिक बरीच बरीच शक्ती लागली. असे तिने सांगितले.
रुग्णालयातही पाठीचेच केले स्ट्रेचर
• निहारिका म्हणाली की, “नागाव येथे पोहोचल्यावरही पाठीवरून सासऱ्यांना पायऱ्या चढून कोरोना रुग्णालयात जावे लागले.
• तिथे मी मदतीसाठी विचारणा केली पण कोणीही पुढे आले नाही.
• मला वाटते की, त्या दिवशी मी सासर्यांना पाठीवरुन घेऊन २ किमी चालली.
• या दरम्यान कोणीतरी निहारिकाचा फोटो काढला असावा.
• निहारिकासुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहे.
• सोशल मीडियावर तिची आदर्श सून म्हणून वर्णन केले जात आहे.
• आता तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आसामच्या या कथेने गावातील आरोग्य सेवेचे भीषण वास्तव उघडकीस आणले आहे. निहारिका म्हणाली की, “तिला गावात रुग्णवाहिकासुद्धा मिळाली नाही. एका छोट्या व्हॅनमधून त्यांना शहरात आणावे लागले. चांगली गोष्ट अशी आहे की, या काळात सासऱ्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासली नाही. मात्र, दोघांनाही ५ जूनला गुवाहाटीच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, तिथे थुलेश्वर दास यांचा मृत्यू झाला.