मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारने कोरोनाग्रस्त लहान मुलांच्या उपचारासाठी नवीन गाइडलाईन्स जारी केल्या आहेत. या नव्या गाइडलाईन्सनुसार लहान मुलांवर सीटी स्कॅनचा वापर योग्य तेव्हाच करावा आणि रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्विस (DGHS) कडून जारी दिशा-निर्देशांमध्ये एसिम्पटॉमॅटिक आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्टेरॉइडचा वापर घातक असल्याचं म्हटले आहे. गाइडलाईनमध्ये सांगितल्यानुसार, १८पेक्षा कमी वय असलेल्या मुलांवर रेमडेसिविरच्या वापराबाबत योग्य आकडेवारी नसल्यामुळे त्या इंजेक्शनच्या त्यांच्यासाठीच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
मुलांसाठी सहा मिनिटांची वॉक टेस्ट
- गाइडलाइंसमध्ये लहान मुलांसाठी ६ मिनिटांच्या वॉक टेस्टच्या सूचना देण्यात आला आहे.
- वॉक टेट्सदरम्यान मुलांच्या बोटावर पल्स ऑक्सिमीटर लावून त्यांना सहा मिनिटे चालण्यास सांगावे.
- यानंतर मुलांची ऑक्सिजन सॅचुरेशन लेव्हल आणि पल्स रेट चेक करावा. यामुळे हॅप्पी हाइपोक्सियाची लक्षणे कळू शकतात.
काय आहे हॅप्पी हायपोक्सिया?
- कोरोना महामारी आणि ब्लॅक फंगसदरम्यान हॅप्पी हायपोक्सियादेखील घातक ठरत आहे.
- हा आजार डॉक्टरांसाठी नवे आव्हान बनला आहे.
- या आजारात कोरोना लक्षणे आढळत नाहीत, पण अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन रुग्णाचा मृत्यू होतो.
- हॅप्पी हायपोक्सियात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत.
- रुग्ण स्वतःला निरोगी समजतो, पण अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी होते.
स्टेरॉयडचा विचारपूर्वक वापर करण्याचा सल्ला
- DGHS ने फक्त रुग्णालयांमध्ये भरती गंभीर रुग्णांना कडक देखरेखीखाली स्टेरॉयडच्या वापराचा सल्ला दिला आहे.
- DGHS ने सांगितल्यानुसार, ‘स्टेरॉयडचा वापर योग्यवळी आणि योग्य प्रमाणात दिला जावा.
- तसेच, रुग्णाने स्वतः स्टेरॉयडचा वापर टाळावा.
मुलांसाठीच्या इतर महत्वाच्या सूचना
- लहान मुलांनी कायम मास्क घालावा.
- हात स्वच्छ धुवावेत.
- सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं
- लहान मुलांना कायम पौष्टिक आहार द्यावा. यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती उत्तम राहील
- सौम्य लक्षणं दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पॅरासिटामोल (१०-१५एमजी)देता येऊ शकते
- घशात खवखव किंवा खोकला आल्यावर मोठ्या मुलांनी गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात
लहान मुलांना गंभीर संसर्गाचा धोका नाही
- देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे.
- कोरोना रुग्णांची संख्या देशात सतत कमी होत आहे.
- पण तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतो असं बोललं जात आहे.
- यावर एम्सचे संचाल डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे.
- लहाना मुलांना कोरोनाच्या लाटेचा गंभीर धोका असल्याचा डाटा जगात कुठेही उपलब्ध नाही आणि पुरावेही नाहीत, असं डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं.