मुक्तपीठ टीम
कोरोना लसींचे ५००पेक्षा जास्त डोस वाया घालवल्यामुळे एका केमिस्टला तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. अमेरिकेतलं सर्वात मोठं पाचवं शहर असलेल्या मिलवॉकीमध्ये लसी वाया घालवल्याने एका केमिस्टला ३ वर्षांचा कारावास झाला आहे. त्याने अयोग्य पद्धतीने ठेवलेल्या लसींचे डोस काहींनी घेतल्यामुळेही चिंता व्यक्त होत आहे. आपल्याकडे राजस्थानातही मोठ्या प्रमाणावर लसी वाया घालवण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे अशी कारवाई आपल्याकडे शक्य आहे का, असा प्रश्न समोर आला आहे.
कोरोना लसी वाया कशा गेल्या?
• स्टीवन ब्रांडेनबर्ग असं ४६ वर्षीय केमिस्टचं नाव आहे.
• त्याने कोरोना लसीकरणाच्या ५०० हून अधिक लसी वाया घालवल्या आहेत.
• त्याने फेब्रुवारी महिन्यात गुन्ह्याची कबुली दिली होती.
• मिलवॉकी शहराच्या उत्तर भात ऑरोरा मेडिकल सेंटरमध्ये त्याने मॉडर्ना लसी अनेक तास रेफ्रिजरेटरच्या बाहेर ठेवल्या.
• लसी वाया घालवल्याचा आपल्याला पश्चाताप असल्याचं, तसंच या प्रकरणाची जबाबदारी घेत असल्याचं त्याने न्यायालयासमोर सांगितलं होतं.
• तसंच केमिस्टमधील कर्मचारी आणि स्टीवनच्या कुटुंबियांनीही समाजाची माफी मागितली.
• स्टीवनकडे असणाऱ्या लसींच्या साठा नष्ट करण्यात आला आहे.
• मात्र तोपर्यंत ५७ लोकांचं लसीकरण झालं होतं. त्यामुळे लसीकरण झालेले स्थानिक चिंतीत असल्याची माहिती मिळतेय.
अमेरिकेसारखा महासत्ता असलेल्या देशाची लसीकरणासाठीची व्यवस्था उल्लेखनीय आहे. प्रत्येक लस ही महत्वाची, तिचा पुरेपूर वापर व्हावा यासाठीचा सरकारचा अट्टाहास या योग्यच आहे. आपल्या देशातही २१ जूनपासून लसीकरण सुरु होत आहे. योग्य नियोजन आणि नियमांचं पालन केल्यास प्रत्येक नागरिकाला लसी मिळू शकतात. मात्र लसींचा गैरवापर झाल्यास आपल्याकडे अमेरिकेसारखं कडक पाऊल टाकलं जाईल का?