मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात मराठा आरक्षणामुळे वातावरण तापत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांनी कोल्हापुरात १६ जून रोजी मराठा मोर्चाची हाक दिली आहे. त्याचवेळी आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीही येत्या १५ जून रोजी राज्यव्यापी ओबीसी मोर्चाचे आवाहन केले आहे.
ओबीसींचा मोर्चा कशासाठी?
• मराठा आरक्षणाप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाने एका वेगळ्या निकालात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे.
• त्यामुळे ओबीसी समाज आणि राजकीय नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
• ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी मोर्चाची हाक दिली आहे.
• एक स्वतंत्र आयोग नेमून ओबीसी समाजाची सांख्यिकी गोळा करावी.
• त्यानंतर ही सांख्यिकी सर्वोच्च न्यायालयात सादर करावी.
• तरच ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकेल. सरकारने हे आरक्षण टिकवावे, या मागणीसाठी येत्या १५ जूनला ओबीसी समाज रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करेल.