मुक्तपीठ टीम
दोन महिन्यानंतर राज्यासह मुंबईत अनलॉक झाले आहे. एकीकडे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पुन्हा सुरू होत आहेत तर, दुसरीकडे मात्र मुंबईतल्या सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध अशा फाईव्ह स्टार हॉटेल पैकी एक हयात रिजन्सीचे दरवाजे ग्राहकांसाठी तात्पुरते बंद करण्यात आले आहे. सोमवारी हॉटेल व्यवस्थापनाने आपल्या कर्मचाऱ्यांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी कंपनीकडे पसे नाही म्हणून नाईलाजाने डॉटेल सेवा तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळवले आहे.
कोरोना लॉकडाऊनचा फटका, अनलॉक होताच लॉक!
• हयात ही एक अमेरिकन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटॅलिटी चेन असून मुंबईतलं तिचं युनिट बंद करण्यात आलं आहे.
• कोरोना महामारीमुळे प्रवासात कमालीची घट झाली.
• त्यात पुन्हा जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील लॉकडाऊनमुळे हॉस्पिटॅलिटी उद्योगाला मोठा फटका बसला. त्याचाच हा परिणाम असल्याचे मानले जाते.
• विशेष म्हणजे ज्यादिवशी महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात झाली, त्याच दिवशी हयात रेजेंसी तात्पुरते बंद करण्याची घोषणा केली गेली आहे.
बॉलिवूड पार्टी आणि कार्यक्रमांसाठी आवडते ठिकाण
• मुंबईतील नामांकित फाईव्ह स्टार हॉटेल्सपैकी हयात रिजंसी एक आहे.
• ते अमेरिकन समुहाशी संबंधित असल्यामुळे बॉलीवूड पार्टीज पासून ते इतर सगळ्या कार्यक्रमासाठी आडते ठिकाण मानले जात असे.
• हे हॉटेल मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या जवळ आहे.
• हॉटेलची मालकी ही एशियन हॉटेल या कंपनीकडे आहे.
पत्रात नेमकं काय म्हटले आहे?
• हयात रेजेंसी ही जरी अमेरिकन हॉटेल चेन असली तरी मुंबईतल्या युनिटचे मालक भारतीय कंपनी आहे.
• मुंबईतील हयात रिजंसीची मालकी नाव एशियन हॉटेल्स वेस्ट.
• हॉटेल तात्पुरतं बंद करताना जे पत्र लिहिले आहे, त्यात म्हटलं आहे की, मालक कंपनीकडून निधी मिळालेला नाही.
• त्यामुळे पुढच्या आदेशापर्यंत हॉटेल्सचे सगळे ऑपरेशन्स बंद असतील.
• विशेष म्हणजे निधी नसल्यामुळे हॉटेलचं मॅनजमेंट कर्मचाऱ्यांचा पगारही देऊ शकलेलं नाही.