मुक्तपीठ टीम
महात्मा गांधींच्या दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या पणतीला फसवणूकीच्या आरोपाखाली सात वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. आशीष लता रामगोबिन यांनी एका उद्योजकाची ६० लाख रुपयांच्या फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणात त्यांना डर्बन न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले आहे.
फसवणुकीचे आरोप काय?
• आशिष लता रामगोबिन यांच्यावर एसआर महाराजांची फसवणूक केल्याचा आरोप होता.
• एसआर महाराजांनी सांगितले की लता यांनी नफ्याचे आमिष दाखवून पैसे घेतले होते.
• महाराज यांनी लताला एक आयात मालाचे सीमा शुल्क भरण्यासाठी ६० लाख रुपये दिले होते.
• प्रत्यक्षात असा कुठलाच माल येणार नव्हता.
• लता यांनी त्या आयात मालाच्या नफ्यातील काही भाग त्या एसआर महाराजांना देणार होत्या.
• लता रामगोबिनविरूद्धच्या खटल्याची सुनावणी २०१५ मध्ये सुरू झाली.
• दक्षिण आफ्रिकेतील न्यायाधिकरणाकडे ब्रिगेडिअर हंगवानी मौलौदजी यांनी पुरावे मांडले होते.
• रामगोबिन यांनी कपड्यांचे तीन कंटेनर भारतातून पाठवले जात असल्याचे गुंतवणूकदारांना पटवून देण्यासाठी बनावट पावत्या व कागदपत्रे दिली होती.
• ती कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना पैसे
• त्यावेळी लता रामगोबिन यांना ५०,००० रँडच्या जामिनावर जामीन मिळाला.
• सोमवारी या प्रकरणात त्या दोषी आढळल्या आणि तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
लता रामगोबिन काय करतात?
• लता रामगोबिन या प्रसिद्ध हक्क कार्यकर्ते इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिंद यांच्या कन्या आहेत.
• इंटरनॅशनल सेंटर फॉर अहिंसा या संस्थेचे कार्यकारी संचालक रामगोबिन यांनी पर्यावरण, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते म्हणून स्वत: ची ओळख आहे.
• आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केल्याबद्दल इला गांधी यांचा अनेक वेळा सन्मान झाला आहे.
• लता या दाम्पत्याच्या कन्या आहेत.
• त्या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिक आहेत.
• तेथे त्या आयात-निर्यात व्यवसायातही आहेत.
• त्यांना शिक्षा झालेले प्रकरणही त्या व्यवसायाशी संबंधित आहे.