मुक्तपीठ टीम
धाबा म्हटले की प्रवाशांसाठी हक्काचं चविष्ट आणि ताजं अन्न हमखास मिळणारं ठिकाण. यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ७वरील करंजी गावाजवळ असाच एक माणुसकीचा लंगर धाबा आहे. ८२ वर्षांचे बाबा करनाल सिंह खैरा हे ‘गुरु का लंगर’ धाबा चालवतात. नेहमीही हात जोडून हसऱ्या चेहऱ्याने थकलेल्या आणि भुकेल्या प्रवाशांचे बाबाजी मनापासून स्वागत करतात. टीमला गरम अन्न वाढण्यास सांगतात. तेथून जाणारा कुणीही भुकेला जात नव्हता. प्रवासी, गावकरीच नाही तर भटक्या प्राण्यांसाठी २४ तास जेवण सुरु होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जगप्रसिद्ध झालेला हा लंगर धाबा दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन लंगरमुळे चर्चेत आला. बाबांनी १५ सिलिंडरसह एक ‘ऑक्सिजन बँक’ सुरू केली आहे, ज्यात गरजू कोरोना रूग्णांना साथीच्या दुसर्या लाटेमध्ये विनामूल्य ऑक्सिजन देण्यात आले आहे. त्यामुळे खैरा बाबाजी जणू ग्लोबल फेमस आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी झाले आहेत. त्यांचं सत्कार्य आहेच तसं.
जगभरातून बाबांच्या लंगरला साथ
- अमेरिकेची लेखिका सबीना खान, बंगळुरूचे अमरदीप सिंग, यवतमाळचे किशोर तिवारी आणि अमृतसर गुरुद्वारा का बागचे सलीम खेतानी, नरेंद्र नारलावार, बाबा सतनाम सिंह आणि बाबा कृपाल सिंह आणि आसपासच्या अनेक लोकांनी या लंगरसाठी दान दिले आहे.
- त्यामागे त्यांची लंगर सेवा कायम राहावी, हा हेतू आहे.
- १९८८ मध्ये आम्ही महामार्गावर ही लंगर सेवा सुरू झाली.
- बाबा नरिंदरसिंहजी आणि नांदेड गुरुद्वारा साहिबचे बाबा बलविंदरसिंहजी यांच्या आशीर्वादाने हे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी खैरा बाबांवर सोपविली होती.
खैराबाबा लंगर सेवाकार्यात मग्न…
- खैराबाबा लंगर सेवाकार्यात कायम मग्न असतात.
- त्यांचे फोटो आणि फोन नंबर सोशल मीडियावर व्हायरल आहेत.
- आता लोक त्यांना अगोदरच कॉल करतात आणि ५०, १०० किंवा ५०० लोकांच्या मोठ्या किंवा लहान गटांसाठी अन्न तयार ठेवण्याची विनंती करतात.
- हा गुरु नानकसाहेबांचा आशीर्वाद आहे, असे खैरा बाबा मानतात.
- त्यांचे मूळ नाव कर्नाल. ते उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये जन्मले.
- वयाच्या ११ व्या वर्षी मानवजातीची सेवा करण्यासाठी घर सोडले आणि नंतर संपूर्ण भारत प्रवास केला.
- जवळजवळ १० वर्षे मध्य पूर्व आणि युरोप देशांमध्ये राहिले आणि गुरुद्वारासाठी पैशाचे आयोजन केले.
- खैरा बाबा अभिमानाने सांगतात, ‘अर्ध साक्षर असलो तरी मी, इंग्रजी, हिंदी, पंजाबी, अरबी, डच, जर्मन आणि मराठी या सर्व भाषा बोलतो’.
पाहा व्हिडीओ: