मुक्तपीठ टीम
देशात लवकरच आणखी एक स्वदेशी कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, या लसीची किंमत आतापर्यंतच्या सर्व लसींच्या किंमतींपेक्षा कमी असणार आहे. भारतातील सर्वात जुनी लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल-ई ही ‘कॉर्बेव्हॅक्स’ या नावाने लस तयार करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या लसीच्या एका डोसची किंमत २५० रुपये असेल.
आणखी एक स्वदेशी पण स्वस्त लस!
• बायोलॉजिकल-ई ही कंपनी ‘कॉर्बेव्हॅक्स’ या नावाने लस बनवत आहे.
• परवानगी मिळाली की लस बाजारात येईल.
• या लसीची किंमत प्रति डोस २५० रुपये असेल.
• ही देशातील सर्वात स्वस्त लस असेल.
• कोरोनापासून बचाव करण्यासाठी, या लसीचे दोन डोस घ्यावे लागतील.
• केंद्र सरकारने कंपनीला १५०० कोटी रुपये अॅडव्हान्स दिले असून यापूर्वीच जवळजवळ ३० कोटी डोस बुक केले आहेत.
• भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियन लस स्पुटनिक-व्ही यांनी तयार केलेल्या लस लोकांना दिल्या जात आहेत.
• केंद्र सरकार देशातील ४५ पेक्षा अधिक नागरिकांच्या विनामूल्य लसीकरणासाठी लस पुरवत आहे.
• त्याचबरोबर, १८ वर्ष वयोगटासाठी केंद्राने राज्य व खासगी रुग्णालयांना थेट कंपनीकडून लस खरेदी करण्याची परवानगी आधीच दिली आहे.
देशातील लस टंचाईवर होऊ शकेल दूर
• सरकारने कॉर्बेव्हॅक्स लसीची मागणी नोंदवली आहे.
• पण अद्याप लसीच्या वापरास मान्यता मिळालेली नाही.
• येत्या एक-दोन महिन्यांत लस वापरास मान्यता मिळेल, अशी कंपनीची अपेक्षा आहे.
• ऑगस्ट महिन्यापासून दरमहा सुमारे साडेसात ते आठ कोटींच्या लसी तयार केल्या जाऊ शकतात असा कंपनीचा दावा आहे.
• जर तसे झाले तर, देशात लसीची कमतरता भासणार नाही.