प्रा.सलमान सय्यद
आपल्याला ५ जून हा दिवस आला की पर्यावरणा ची आठवण येते परंतु पर्यावरण हा आपल्या दैनंदिन जीवनाचा प्रश्न आहे. आणि त्या विषयी जागृत रहाणं हे आपलं कर्तुव आहे. याच कारणाने इस्लाम मध्ये पर्यावरणा विषयी खूप व्यापक शिक्षा दिली आहे.
झाडाचं महत्व पटवून देण्यासाठी प्रेषित मुहम्मद स.स म्हणतात की,”जर तुमच्या हातात वृक्षांच रोप आहे आणि महाप्रलय आला हे दिसत आतांनी सुध्दा ते हातातील रोप जमिमित लावून टाका.”
या वाचनात आम्हाला वृक्ष लागवडीच महत्व कळलं असेल की जेंव्हा महाप्रलय म्हणजेच शेवटचा दिवस आणि त्या ठिकाणी सुद्धा झाड लावण्याला प्राथमिकता दिली. सोबतच त्याचे संवर्धन करणे यावर सुद्धा भर दिला. फळाच्या झाडा बद्दल प्रेषितांनी सांगितले की ,”जर कोणत्याही व्यक्तीने फळं असलेल्या वृक्षाची रोपटं लावली आणि तो झाड फळाने बहरुन गेलं तर वृक्ष लावणाऱ्या व्यक्तीला फळाबरोबर पुण्य मिळेल.”
आता या वाचनात प्रेषितांनी फळंदार झाडाला लावण्या सम्बधी प्रोत्साहन दिलं सोबतच पर्यावरण संवरक्षण आणि संवर्धन या बद्दल माहिती दिली.तसेच प्रेषित मुहम्मद स.स यांनी सांगितले की वृक्षारोपण हे एक शाश्वत पुण्याइचे कार्य आहे.
अश्या प्रकारे प्रेषितांनी पर्यावरण आणि संवर्धन या विषयी व्यापक आपला दृष्टीकोन दिला तसेच जगातील प्रथम अभयारण्याची सुरुवात केली प्रेषित मुहम्मद स.स यांनी मदीना शहराजवळील ३० किलोमीटर चा परिसरात (हाराम) म्हणजेच निषिद्ध वृक्ष तोंडी साठी आणि प्राण्यांच्या हत्येसाठी निषिद्ध करून जगाला अभयारण्याची संकल्पना दिली अश्या प्रकारे प्रेषित मुहम्मद (स.स) यांनी पर्यावरणा विषयी उद्गार दृष्टिकोन ठेऊन पर्यावरणाचे महत्व सांगितले.
(प्रा.सलमान सय्यद, पुसद, संपर्क-9158949409)