मुक्तपीठ टीम
मॉडर्ना आणि फायझरच्या कोरोना लस देशात उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार कंपनीच्या अटी मान्य करण्यास तयार झाले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच डिजीसीआयने म्हटले की, या लसींना जगातील मोठ्या देशांकडून आणि जागतिक आरोग्य संघटने म्हणजेच डब्ल्यूएचओकडून आपत्कालीन मंजुरी मिळालेल्या लसींना भारतात वापरासाठी परवानगी दिली जाईल.
संभाव्य समस्यांचा विचार करून लस उत्पादकांच्या अटी
• नुकसान आणि जबाबदारीवर लवकरच निर्णय
• मॉडर्ना आणि फायझर या कंपन्यांनी नुकसान भरपाई देण्याची सक्ती असू न नये अशी मागणी केली आहे.
• आपत्कालीन वापराची परवानगी दिल्यानंतर होणाऱ्या स्थानिक चाचण्यांची सक्ती दूर करण्याची भारत सरकारकडे मागणी केली होती.
लस टंचाईमुळे लस उत्पादकांच्या अटी मान्य केल्या जाणार
• सरकारने अद्याप लसीच्या वापरानंतर होणाऱ्या गंभीर परिणामानंतर नुकसान भरपाई आणि जबाबदारीबद्दल निर्णय घेतलेला नाही.
• कंपन्यांच्या या अटींवर लवकरच निर्णय होऊ शकतो.
• सध्याच्या लस टंचाईमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
• डब्ल्यूएचओसारख्या आरोग्य संघटना आणि मोठ्या देशांमध्ये परवानगी मिळाल्यानंतर भारतात या लसींचा दर्जा आणि स्टॅबिलिटीच्या चाचण्या केल्या जाणार नाहीत.