मुक्तपीठ टीम
दर महिन्याच्या पहल्या दिवशी सरकारी इंधन कंपन्या गॅस सिलिंडरचे भाव ठरवतात. त्यानुसार आज १ जून २०२१ रोजी एलपीजी कमर्शियल सिलिंडर्सचे दर १२२ रुपये प्रति सिलिंडर कमी करण्यात आले आहेत. मात्र, अनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही कपात आजपासून अंमलात आली आहे. आता १९ किलो का सिलिंडर १४७३.५ रुपयांना उपलब्ध असेल.
मुख्य शहरांतील गॅस सिलिंडरचे दर (१९ किलो – कमर्शियल)
• मुंबई- १४२२.५० रुपये
• दिल्ली- १४७३.५० रुपये
• कोलकाता- १५४४.५० रुपये
• चेन्नई- १६०३ रुपये
घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमतीत बदल नाही
• मे मध्येसुद्धा अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही.
• मात्र एप्रिलमध्ये १० रुपयांची कपात करण्यात आली.
• आज दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत ८०९ रुपये आहे.
• दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत यावर्षी जानेवारीत ६९४ रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढून ७१९ रुपये झाली होती.
• १५ फेब्रुवारीला ही किंमत ७६९ रुपये करण्यात आली.
• यानंतर २५ फेब्रुवारीला एलपीजी सिलिंडरची किंमत वाढून ७९४ रुपये झाली.
• मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत कमी करून ८१९ रुपये करण्यात आली.