मुक्तपीठ टीम
येत्या मंगळवारपासून म्हणजेच १ जूनपासून देशात काही महत्त्वाचे बदल होत आहेत. यात टेक्नोलॉजीसंदर्भातील देखील अनेक बदल आहेत. त्यामुळे १ जून पासून होणाऱ्या बदलांबाबत यूजर्सना माहिती करून घेणे गरजेचे आहे.
गुगलच्या फोटो अपलोडिंगमध्ये बदल
• एक जूनपासून लोकप्रिय सर्च इंजिन गुगल काही बदल करण्याच्या तयारीत आहेत.
• गुगल फोटोमध्ये १ जूनपासून अनलिमिटेड फोटो अपलोड करता येणार नाहीत.
• गुगलकडून प्रत्येक जीमेल यूजर्सला १५ जीबी स्पेस दिली जाते.
• १५ जीबी पेक्षा अधिक स्पेस हवी असल्यास गुगल वन सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
यूट्युबची टॅक्स पॉलिसी
• यूट्युब हे लोकप्रिय माध्यम मनोरंजनाचे तर आहेच पण अनेकांसाठी उत्पन्नाचे साधनही बनले आहे.
• आता अशा कमावत्या लोकांना युट्यूबवरून होणाऱ्या कमाईवर यूट्युबला कर द्यावा लागेल.
• युट्यूबने अमेरिकेच्या बाहेर युट्यूब क्रिएटर्सकडून कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
• एक जून पासून हा नियम लागू होईल.
रिलायन्स आणि आयटेलचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन-
• स्मार्टफोन कंपनी आयटेलने रिलायन्स जियोसोबत ए२३ प्रॉ ४जी हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.
• या स्मार्टफोनची मूळ किंमत ४,९९९ रुपये आहे, मात्र लाँचिंग ऑफर अंतर्गत स्मार्टफोनला ३,८९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.
• स्मार्टफोनच्या खरेदीसोबत यूजर्सना ३ हजार रुपयांच्या रिचार्जची ऑफर सुद्धा दिली जाणार आहे.
• तीन हजारांच्या रिचार्जची ऑफर ग्राहकांना वेगवेगळ्या वाउचर्सच्या स्वरुपात देण्यात येणार आहेत.
• आयटेल ए२३ प्रो ४जी या स्मार्टफोनची विक्री १ जून पासून सुरु होईल.
• रिलायन्स डिजिटल स्टोर, माय जियो स्टोर आणि रिटेल स्टोअर्समधूनही हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.