मुक्तपीठ टीम
“खरा आनंद देण्यातच…” नेहमीच ऐकत असतो आपण. पण प्रत्यक्षात तसे वागणारे कमीच असतात.
लॉकडाऊनने अवघ्या जगालाच व्हेंटिलेटरवर आणून ठेवलं आहे असं वाटतं. त्यात आपण सारेच होरपळून निघालोय. अशा या काळ्याभिन्न वास्तवात आशेचे काही कवडसे मनाला उभारी देतात. चांगलं असं खूप आहे, हे बजावणारे खूप माणसं अवतीभवती दिसतात.
मुंबईतील सौरभ मित्र मंडळाचे कार्यकर्ते अशा जिवंत मनाच्या चांगल्या माणसांपैकीच. सध्या काही समाजसेवी संस्था अनेकांना मदत करण्यात सक्रिय आहेत. मात्र काही गरजूंना एकावेळी चार-चार जणांकडून अन्नदान केलं जातंय. तर दुसरीकडे एकवेळच्या अन्नासाठी काही गरजू गरीब वणवण फिरताहेत. हेच सौरभच्या कार्यकर्त्यांना खटकलं म्हणून ते ज्या गरजूंपर्यंत कुणीही पोहोचलेलं नाहीय किंवा पोहोचत नाहीय, अशांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
ते केवळ टाटा रूग्णालयाजवळील रूग्णांपर्यंतच पोहचले नाहीतर तर सुनसान झालेल्य मंदिर, दर्ग्यांबाहेरील भिकाऱ्यांनाही त्यांनी अन्न पुरवले. एवढेच नव्हे तर आपल्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यांवर-गल्लोगल्ली टाळ्या वाजवत भटकणाऱ्या किन्नरांनाही आपुलकीचे दोन घास दिले. त्यासाठी ते मध्य मुंबईतील अॅण्टॉप हिलजवळील किन्नरांच्या कालीमातेच्या मंदिरात गेले. तेथे मनोभावे पूजा केल्यानंतर त्यांनी २५ किन्नरांना अन्नदानाचा प्रसाद दिला. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावं, यासाठी त्यांनी कालीमातेच्या चरणी साकडं घातलं. एक नक्की, उगाच कर्मकांडापेक्षा कालीमातेला तिच्या या लेकरांनी किन्नर भक्तांना दिलेला अन्नदानाचा प्रसाद अधिकच भावला असणार. ती पावणार आणि कोरोना हरणार, एवढं नक्की.
सौरभ मित्र मंडळाला अनिल धर्माजी जोशी ,दिशानी दिलीप भोसले आणि संदीप घोरपडे यांनी केलेल्या सहकार्यामुळे ते दुसऱ्यांदा अन्नदान करू शकले आहेत. या माणुसकीच्या उपक्रमात आपणही खारीचा वाटा उचलावा, असं ज्यांना वाटत असेल, त्यांनी मंगेश वरवडेकर 932 464 3624, योगेंद्र लोंढे 966 472 9758, प्रफुल गावडे 970 290 7200 यांच्याशी संपर्क साधावा.
ONline transfer
Saurbh bank details
Saurabh mitra mandal
Bank: jankalyan sahkari bank ltd.
Dadar branch
Ac no: 002010100024002
Ifsc code: JSBL0000020
संपर्कासाठी
मंगेश वरवडेकर 932 464 3624
योगेंद्र लोंढे 966 472 9758
प्रफुल गावडे 970 290 7200
Gpay
9324643624
9664729758
9702907200
पाहा व्हिडीओ: