मुक्तपीठ टीम
लिंग बदलानंतर पासपोर्टवरी लिंगात आणि नावात बदल करण्यात येणाऱ्या अडचणींची नवी समस्या आता न्यायालयासमोर आली आङे. बदललेलं नाव आणि लिंगासह पासपोर्ट बदलून न दिल्याबद्दल एका व्यक्तीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या विनंतीनुसार, पासपोर्टमध्ये पुन्हा बदल करून देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकाकर्त्याने न्यायालयाकडे केली आहे. याचिकेवरील सुनावणीनंतर मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी परराष्ट्र मंत्रालयाला नोटीस बजावून मांडण्यास सांगितले आहे.
याचिकाकर्त्याचे म्हणणे काय?
- याचिकाकर्त्याला आधार कार्ड, पॅनकार्ड आणि मतदार ओळखपत्र बदललेल्या नाव आणि लिंगासह दिले गेले आहेत, परंतु पासपोर्ट दिला जात नाही, असा याचिकेत दावा केला आहे.
- याचिकेत नमूद केले आहे की, याचिकाकर्त्याचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड यासह सर्व कागदपत्रे २ डिसेंबर २०१९ रोजी केलेल्या प्रतिज्ञापत्रच्या आधारे जारी करण्यात आली आहेत.
- याचिकाकर्ता याच बदलांसह नवीन पासपोर्ट जारी होण्यास पात्र आहे.
लिंग आणि नाव बदलाची कहाणी…
- याचिकेनुसार, लिंगबदलानंतर बदललेलं नाव आणि लिंगासह पासपोर्ट बदलून देण्यास नकार देण्यात आला आहे.
- याचिकाकर्त्याचा जन्म एक पुरूष म्हणून झाला होता आणि नंतर वर्ष २०१९ मध्ये त्याने प्रतिज्ञापत्र स्वत: घोषित करून त्याचे लिंग एका स्त्रीमध्ये बदलले.
- लिंग परिवर्तन प्रमाणपत्राची आवश्यकता ही बेकायदेशीर आहे आणि यामुळे अनेक तृतीयपंथीयांना त्यांच्या स्वत:ची ओळख पटविणार्या लिंगाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पासपोर्ट घेण्यास प्रतिबंधित केले गेले आहे.
पासपोर्टच नसल्याने लिंगबदलाची प्रक्रियाही अर्धवट
- याचिकाकर्त्याने यापूर्वी बँकॉकमधील डॉक्टरांकडून चेहऱ्यावर स्त्रीलिंगी शस्त्रक्रिया देखील केली आहे.
- बँकॉकमधील त्याच डॉक्टरांकडून ती बाकी शस्त्रक्रिया करणार आहे.
- याचिकेत म्हटले आहे की, “याचिकाकर्त्याकडे सध्या पासपोर्ट नाही आणि म्हणूनच तो त्याच्या पुढील शस्त्रक्रियेसाठी कुठेही प्रवास करू शकत नाही आहे.”