मुक्तपीठ टीम
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी छत्रपती सर्वपक्षीय नेत्याची भेट घेऊन चर्चा करत आहेत. गुरूवारी संभाजीराजेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटींवरून खासदार आणि भाजप नेते नारायण राणे यांनी टीका केली आहे. तसेच मुख्यंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारवरही गंभीर आरोपही केले आहेत. खासदार संभाजी छत्रपती आता नवे नेते होऊ पाहत आहेत, राज ठाकरे आता मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सांगणार का? असे त्यांनी टोले मारल्याचे माध्यमांमध्ये आल्याने चर्चेचा विषय झाले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला. तसेच खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून नारायण राणेंनी राज ठाकरे यांना चिमटे काढले आहेत. ‘म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात आता हे मुख्यमंत्र्यांना सांगणार का?’ असा टोला राणे यांनी राज ठाकरेंना लगावला. ‘मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे फिरत असून ते आता नवीन नेते होऊ पाहत आहेत,’ असं म्हणत त्यांनी संभाजीराजेंवरही निशाणा साधला आहे.
नारायण राणे यांची टोलेबाजी
• मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार गंभीर नाही असं विधान काही संभाजीराजे यांनी केलं होतं, यावर ज्यांनी खासदारकी दिली त्यांच्या संदर्भात असं विधान बोलणं, योग्य नसल्याचं नारायण राणे म्हणाले.
• मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं त्यावेळी भाजप सरकारनं दिलं. संभाजीराजे ज्यांच्या दारी फिरत आहेत, त्यांनी काय केलं?
• शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी काय केलं असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला.
• ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत किती गंभीर आहे? स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मताचे नसल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे.
मराठा आरक्षणासाठी भाजपाची काळजीपूर्वक पाऊलं
• ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी भाजपचे नेते राज्याचे नेते दौरे करत आहेत.
• सरकारने आता जो प्रस्ताव पाठवायाचा आहे तो अभ्यासपूर्ण असला पाहिजे.
• त्यासाठी चांगले वकील आणि सर्वोच्च कोर्टाने नाकारलेले मुद्दे आहेत, त्याला धरुन योग्य प्रस्ताव गेला पाहिजे.
• तसा प्रस्ताव भाजप तयार करत असून भाजपनं काही वकील नेमले आहेत.
भ्रष्टाचाराचेही गंभीर आरोप
• नारायण राणेंनी राज्य सरकारवर लसीकरणाच्या टेंडरवरून गंभीर आरोप केले.
• या टेंडरमध्ये १२ टक्के पैसे ठेकेदाराकडे मागितल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे.
• नारायण राणेंनी राज्य सरकारवर लसीकरणाच्या टेंडरवरून गंभीर आरोप केले.
• कोरोना आला हे यांच्यासाठी बरं झालं, त्यांना पैसा मिळत आहे, असं राणे म्हणाले.