मुक्तपीठ टीम
बॉलिवूडमधील बरेच अभिनेते, अभिनेत्री कोरोना काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच गरजूंच्या मदतीसाठी धावतो. आता तो बॉलिवूडमधील ३६०० डान्सर्सना मदतीचा हात देणार आहे. त्याने डान्सर्सना महिन्याचे रेशन किंवा पैश्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. डान्स कोरिओग्राफर गणेश आचार्यच्या ५० व्या वाढदिवसादिवशी, अक्षयने विचारले की वाढदिवसानिमित्त काय भेट हवी आहे? गणेश आचार्यनी त्याला १६०० जुनियर डान्स कोरिओग्राफर, वृद्ध डान्सर्स आणि २००० बॅकग्राऊंड डान्सर्सना एक महिन्याचे रेशन देण्यास सांगितले. अक्षयने लगेचच मान्य केले. आणि केलेही. अक्षय कुमारच्या या रिअल हिरोगिरीला मुक्तपीठ टीमचा सलाम!
सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात काम बंद असल्याने दोन वेळच्या जेवणाचेही वांधे झाले आहेत. अनेकांना संकटाचा सामनाही करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे त्यांच्याकडे कोणतेही काम नाही आणि त्यांचे उत्पन्नाचे साधन त्यांनी गमावले आहे. म्हणूनच अभिनेता अक्षय कुमार या डान्सर्सना मदत करणार आहे.
गणेश आचार्यांनी मागितली वाढदिवासाची भेट
डान्स कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी सांगितले की, “अक्षय खूप दयाळू आहे. माझ्या ५० व्या वाढदिवसादिवशी, अक्षयने मला विचारले की वाढदिवसा निमित्त काय भेट हवी आहे. यावर, मी त्याला १६०० जुनियर डान्स कोरिओग्राफर, वृद्ध डान्सर्स आणि २००० बॅकग्राऊंड डान्सर्सना एक महिन्याचे रेशन देण्यास सांगितले. अक्षयने लगेचच मान्य केले. माझी पत्नी गणेश आचार्य फाउंडेशनमध्ये कार्यरत आहेत. ती स्वत: पॅकिंग आणि डिलिव्हरीची देखरेख करते. वितरण क्षेत्र स्वच्छ आहे, सुरक्षितता आणि आरोग्याची काळजीही घेतली जाते. ज्या डान्सर्स आणि डान्स कोरिओग्राफरचे तपशील आमच्याकडे नोंदणीकृत आहेत त्यांना एकतर रेशन किट किंवा ते खरेदी करू शकतील इतकी रक्कम दिली जाणार आहे.” असे ते म्हणाले.
गणेश आचार्यनी दिलेल्या माहितीनुसार डान्सर्सना विभागानुसार मदत पोहोचवण्याची व्यवस्था वर्षभरापासून कार्यरत झाली आहे. आता अक्षय कुमारमुळे त्यात मोलाची भर पडली आहे.
पाहा व्हिडीओ: