मुक्तपीठ टीम
तुला चंद्र देईन प्रिये…प्रेमात प्रियकर प्रेयसीला वाट्टेल ते आश्वासन देतो. अर्थात ते पाळता येईल असं नसतंच असं आजवर मानलं जायचं. आता मात्र दिलेलं तसं वचन चंद्रावरील जमिनीच्या रुपानं काही प्रमाणात तरी पूर्ण करता येईल. आता आपल्या हिमाचल प्रदेशातील कपूर कुटुंबाचेच पाहा. त्यांनी मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. मुलाच्या सातव्या वाढदिवसाच्या वेळी ही भेट दिली. अमेरिकेच्या एजन्सीकडून त्यांनी सुमारे साडेतीन लाखात चार एकरांची जमिन खरेदी केली आहे. त्यांना अमेरिकन एजन्सीने चंद्रावर जमीन खरेदी संबंधित कागदपत्रेही पाठविली आहेत.
गिरीकचे वडील संजू कपूर यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाला मोठे होऊन अंतराळवीर व्हायचे आहे. त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्याचे मनोबल वाढविण्यासाठी आम्ही चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.
कशी केली चंद्रावर जमीन खरेदी?
• अमेरिकेतील एक संस्था चंद्रावरील भूखंड विकते.
• गिरीकची आई वंदना कपूर म्हणाली की त्याआधीही अमेरिकेन कंपनीच्या माध्यमातून लोकांनी चंद्रावर जमीन खरेदी केल्या आहे.
• या कुटुंबाने चंद्रावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन-दोन एकर जागा खरेदी केल्या आहेत.
• कागदपत्रांनुसार एक जागा बे साइड व दुसरी जागा लेक ऑफ ड्रीमवर खरेदी करण्यात आली आहे.
संजू कपूर हे हिमालयातील एका मोठे व्यावसायिक आहेत. त्याचा मुलाचे स्वप्न हे चंद्रावर जाण्याचे आहे. या स्वप्नाला उभारी देण्यासाठी, गिरीकच्या सातव्या वाढदिवसा वेळी त्याच्या पालकांनी चंद्रावर जमीन खरेदी करून ही भेट दिली.
पाहा व्हिडीओ: