मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालकांसह डॉक्टरही चिंताग्रस्त झाले आहेत. त्याचवेली एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील फायझरने लहान मुलांसाठी त्यांची लस उपयोगी असल्याचा दावा केला आहे. फायझरची लस १२ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील सर्वांसाठी प्रभावी आणि सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यासह कंपनीने ही लस एका महिन्यासाठी दोन ते आठ अंश तापमानात ठेवली जाऊ शकते, असे सांगितले आहे.
कशी प्रभावी आहे फायझरची लस?
• फायझरने म्हटले आहे की, त्यांची लस भारतात पसरलेल्या एसएआरएस–सीओव्ही -२ या व्हेरिएंटविरूद्ध खूप प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.
• ही लस एका महिन्यासाठी दोन ते आठ डिग्री तापमानात ठेवली जाऊ शकते.
• फायझर जुलै ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत फाइजर लसीचे पाच कोटी डोस भारतात पाठवणार आहे.
• मात्र, फायझरला नुकसान भरपाईच्या हमीसोबतच महत्वपूर्वक नियमामध्ये काही प्रमाणात सूट हवी आहे.
या आठवड्यात भारतीय अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत फायझरने विविध देश आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) द्वारा त्यांच्या लसींचा प्रभाव असलेल्या चाचण्या आणि त्या लसींना मान्यता देण्यासंबंधी नवीनतम आकडेवारीही सादर केली. “भारत आणि जगाची सध्याची परिस्थिती सामान्य नाही,” असे भारतासोबत झालेल्या चर्चेत सामील असलेले फायझरच्या उच्च स्त्रोताने सांगितले.
आणखी एका स्त्रोताने सांगितल्यानुसार, भारत सरकार आणि फायझर चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष अल्बर्ट बुर्ला यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर कोरोना लसीची मंजुरी त्वरित मंजूर करण्यासाठी दोन्ही पक्षांनी तीन प्रमुख मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करण्याचे मान्य केले आहे. ज्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून लसींची खरेदी, नुकसानभरपाई, देणे आणि मंजुरीनंतर अभ्यासासाठी आवश्यक नियमनाबद्दलच्या आवश्यकतांचाही समावेश आहे.