मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीबद्दल शहरी सुशिक्षितांमध्येच प्रचंड गैरसमज असतात. तर मग दुर्गम भागातील पाड्यांवर राहणाऱ्या आदिवासी समाजात किती असतील ते सांगायला नकोच. त्याचा सर्वात मोठा तोटा या भागात लसीकरण करताना होत आहे. त्यामुळेच आदिवासी समाजातील भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी पालघरमधील वारली चित्रकार पुढे सरसावलेत. वारली चित्रकलेतून आदिवासी बांधवांना लक्षणे दिसल्यास चाचणी करण्याचे तसेच लसीकरण करण्याचा संदेश दिला जात आहे. इयत्ता ११ वीत शिकणारी तन्वी वरठा आणि इयत्ता ११ वीत शिकणारी सुचिता कामडी या दोन विद्यार्थीनींनी आदिवासी बोलीभाषेचा वापर करून वारली चित्र तयार केलीत. त्यामुळे आदिवासी समाजामध्ये कोरोना विषयी जनजागृती होण्यास मदत होत आहे.
पालघर जिल्हयात डहाणू, तलासरी, पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा हा भाग आदिवासी बहूल असून आदिवासी समाजात करोना आजाराविषयी भिती आणि गैरसमज आहे. ताप, खोकला, सर्दी सारखी लक्षणे असताना अंगावर आजार काढण्याचे तसेच गावठी औषधोपचार करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात करोनाचा प्रासार दिसून येत आहे. त्याचबरोबर करोना अजारासाठी प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी आदिवासी समाजात भितीचे वातावरण असून गैरसमज पसरवले जात आहेत. त्यामुळे पालघर जिल्हयातील आदिवासी भागात लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी तन्वी अणि सुचिता हीने बोली भाषेचा वापर करुन कोरोना लक्षणांची माहिती देऊन औषधोपचार तपासणी करण्यासाठी आदिवासी समाजाला आवाहन केले आहे.
पाहा व्हिडीओ: