मुक्तपीठ टीम
आपण आपले फोटो आणि व्हिडिओ जपून ठेवण्यासाठी गुगलची क्लाउड सेवा वापरत असल्यास आपल्यास ही बातमी जाणून घेणे फार महत्वाचे आहे. कारण याकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला हे महागात पडू शकते. गुगलने पुढच्या महिन्यापासून गुगल फोटोमधील विनामूल्य अनलिमिटेड स्टोरेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जूनपासून, कंपनी वापरकर्त्यांना गुगल फोटोमध्ये फोटो आणि व्हिडिओ स्टोर करण्यास केवळ १५जीबी पर्यंत विनामूल्य डेटा स्टोर करण्यास परवानगी देईल. याचा वापर अधिक करणाऱ्यांकडून कंपनी शुल्क आकारेल. गुगल फोटो सध्या इंटरनेटवरील सर्वोत्कृष्ट फोटो स्टोरेज प्लॅटफॉर्म आहे.
१ जूनपासून, गुगल हाय क्वालिटी फोटो सेव्ह करेल, परंतु तो फोटो गुगल अकाउंट स्टोरेजमध्ये जाईल. याचा अर्थ असा की, गुगल स्टोरोज भरल्यानंतर आपल्याला गुगल वनकडून त्याचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
पैसे खर्च करायचे नसतील तर, हे करा
गुगलची ही सेवा विकत घेऊ इच्छित नसल्यास गुगल फोटो वरून सर्व डेटा डाउनलोड करू शकता आणि आपल्या लोकल ड्राइव्हमध्ये सुरक्षित ठेवू शकता.
ड्राइव्हमधून फोटो कशाप्रकारे करावेत डाउनलोड-
१. सर्वप्रथम कॉम्प्यूटर / लॅपटॉपमधील कोणत्याही ब्राउझरवरून Takeout.google.com उघडावे लागेल.
२. त्यानंतर गुगल अकाउंट क्रेडेन्शियल्ससह लॉगिन करा. आता डिलिलेक्ट ऑल चेकबॉक्सवर क्लिक करावे लागेल.
३. त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि गूगल फोटो पर्याय निवडा. येथे आपण गुगल फोटोवरून डेटा डाउनलोड किंवा एक्सपोर्ट करू इच्छित आहात त्याचे स्वरूप निवडावे लागेल.
४. वापरकर्ते फोटो अल्बम समाविष्ट करून एक्सपोर्टसाठी पॉप-अप ओकेवर करा.
५. आता खाली स्क्रोल करा आणि नेक्स्ट स्टेप बटणावर क्लिक करा. डिलीवरी मेथड पर्यायात ‘सेंड डाउनलोड लिंक वाया ईमेल’ निवडा आणि फ्रीक्वेन्सी सेक्शनमध्ये एक्सपोर्ट निवडा.
६. शेवटी .zip पर्याय निवडून डाउनलोड साइझ निवडा. यात आपण २जीबी ते ५०जीबी पर्यंत पर्याय निवडू शकतो.
७. त्यानंतर क्रिएट एक्सपोर्ट बटणावर क्लिक करा, त्यानंतर एक्सपोर्ट लिंकच्या प्रोग्रेसचा संदेश मिळेल, जसं की ही लिंक किती तास किंवा किती दिवसात तयार होईल.
८. एकदा एक्सपोर्ट तयार झाल्यावर आपल्या मेलवर डाउनलोड लिंक मिळेल.
या प्रकारे पैसे वाचविण्यातही आपल्याला मदत मिळेल. गुगलने माहिती दिली आहे की, कंपनीने गुगल फोटो स्टोरेज वापरकर्त्यांसाठी एक नवीन स्टोरेज मॅनेजमेंट टूल आणले आहे. या साधनाच्या मदतीने आपण आपले सर्व दर्जाचे फोटो डिलीट करू शकतो आणि त्यानंतर १५ जीबी पर्यंत स्टोरेज ठेवल्यास आपण सबस्क्रिप्शन पैशांची बचत करू शकाल.
गुगल वन सबस्क्रिप्शन विकत घेण्यासाठी करावा लागेल खर्च
१. गुगल वनच्या सबस्क्रिप्शनसह, तुम्हाला दरमहा १३० रुपये किंमतीत १०० जीबी स्टोरेज स्पेस मिळेल.
२. गुगलकडून या सेवेचे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला बर्याच स्टोरेज स्पेस मिळतील. विशेष गोष्ट अशी आहे की, आपण ही स्टोरेज स्पेस आपल्या कुटूंबासह देखील सामायिक करू शकता.
३. त्याच वेळी, आपल्याला २०० जीबी स्टोरेज स्पेससाठी दरमहा २१० रुपये किंवा प्रतिवर्षी २,१०० रुपये द्यावे लागतील.
४. २ टीबीसाठी भारतात गुगल वनची किंमत दरमहा ६५० रुपये आणि दरवर्षी ६५०० रुपये आहे. १० टीबीसाठी, दरमहा किंमत ३,२५० रुपये आहे.