मुक्तपीठ टीम
राज्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात घरांची आणि झाडांची पडझड झाली. तसेच पावसाळाही तोंडावर आल्याने राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बांधकाम साहित्याशी संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.त्यानुसार निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे.
तौत्के चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले, ही बाब लक्षात घेत बांधकांमांची दुरुस्ती व मजबुतीकरण ही कामे प्रभावित होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने बांधकाम साहित्याशी संबंधित दुकाने यांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश केला आहे. त्यामुळे आता शहरांमध्येही हार्डवेअर आणि पावसाळी साहित्याची दुकाने सुरु करता येतील.
काय आहे राज्य सरकारचा निर्णय
- अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी देण्यात आलेल्या वेळेतच ही दुकाने सुरु राहतील.
- कोरोना नियमांचे पालन न केल्यास दुकानदारांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल.
- राज्य सरकारने छत्र्या, ताडपत्री आणि रेनकोटची दुकाने उघडण्यासही परवानगी दिली आहे.
- कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील अशा साहित्यांची दुकाने व व्यवसाय सुरू राहतील.