मुक्तपीठ टीम
येत्या काही वर्षात, इंटरनेटच्या क्रांतीचा एक नवीन प्रकार दूरसंचार उद्योगात दिसून येईल. या क्रांतीत टेस्लाच्या अॅलन मस्क यांचे नाव घेतले जाते. ते सध्याच्या इंटरनेट वेगापेक्षा प्रचंड वेगाची सेवा उपग्रहाच्या माध्यमातून थेट घरोघरी पुरवणार आहेत. त्यामुळे जिथं इंटरनेट नाही तिथंही स्टारलिंकची सेवा इंटरनेट कनेक्टीव्हिटी मिळवून देईल, अशी शक्यता आहे. त्याचवेळी आता भारतासाठी अभिमानाची बाब अशी की आपल्या भारती एअरटेलच्या सुनील मित्तल यांची कंपनीही अॅलन मस्क यांच्या स्पर्धेत असेल. त्यांच्या भारती समूहाने गेल्या एप्रिल महिन्यात ब्रिटनमधील वन वेबला ताब्यात घेतले आहे. वन वेबने ३६ उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. हे उपग्रह जलद गती इंटरनेट सेवा देतील. वनवेब २०२२ पर्यंत जागतिक सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे आपला भारतीय लोकल प्लेयर आता ग्लोबल भरारी घेणार आहे.
सुनील भारती मित्तल यांच्या नेतृत्वात भारती समूहाने ब्रिटन सरकारच्या मदतीने दिवाळखोरी प्रक्रिया सुरु झालेल्या वनवेब अधिग्रहण केले होते. ही कंपनी जगभरातील देशांमध्ये मोबाइल आणि निश्चित टर्मिनलना ब्रॉडबँड आणि इतर सेवा प्रदान करू शकते.
भारती एअरटेलने जाहीर केल्यानटले आहे की, त्यांचे नेटवर्क ५जीसाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीने आपल्या नेटवर्कची गुणवत्ता सुधारण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये अतिरिक्त स्पेक्ट्रम वापरण्याची घोषणा देखील केली आहे. कंपनीने कर्नाटकमधील ११.२ मेगाहर्ट्झ आणि तामिळनाडूमध्ये पाच मेगाहर्ट्झ अतिरिक्त स्पेक्ट्रम जोडले आहे.
दोन्ही स्पेक्ट्रम १८०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये आहेत ज्यास २जी स्पेक्ट्रम म्हणतात. ग्राहकांच्या बाबतीत मुकेश अंबानीची रिलायन्स जिओ ही टेलिकॉम इंडस्ट्रीजची सर्वात मोठी कंपनी आहे. त्याचबरोबर एअरटेल दुसर्या क्रमांकावर आहे. अॅलन मस्क आणि सुनील मित्तल यांच्या संपत्तीत मोठा फरक आहे. टेस्ला या अमेरिकन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलन मस्क यांची संपत्ती १६८ अब्ज डॉलर्स आहे. ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत.
सुनील मित्तल हे जगातील २९३ अब्जाधीशांपैकी एक आहेत. त्यांची संपत्ती ८.९२ अब्ज डॉलर्स आहे. सध्या सुनील मित्तल हे त्यांच्या भारती समूह दूरसंचार उद्योगात कार्यरत आहेत. तर अॅलन मस्क यांची कंपनी टेस्ला इलेक्ट्रिक कार बनवते. जगातील निवडक कंपन्यांमध्ये त्याचा समावेश आहे.
पाहा व्हिडीओ: