मुक्तपीठ टीम
ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये सायबर क्राइम थ्रेट इंटेलिजेंस एनालिस्ट या पदासाठी १ जागा, सायबर क्राईम इनव्हेस्टिगेटर/ सायबर क्राईम इनव्हेस्टिगेशन रिसर्चर या पदासाठी १ जागा, सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदासाठी ३ जागा, लीगल असिस्टंट या पदासाठी १ जागा अशा एकूण सहा जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) सायबर क्राइम थ्रेट इंटेलिजेंस एनालिस्ट या पदासाठी कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बी.ई आणि बी.टेक असावा. याशिवाय कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये एमटेक किंवा एमसीए केलेला असावा.
२) सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंगची पदवी घेतली असावी.
३) लीगल असिस्टंट या पदासाठी एलएलबी किंवा एलएलएम असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ एक्स सर्व्हिसमॅन उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी उमेदवारांकडून ४५० रूपये शुल्क आकारले जाईल.
ऑनलाईन अर्ज कसा करावा
www.becil.com या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
अधिक माहितीसाठी ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट www.becil.com वरून माहिती मिळवू शकता.