मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या या भयावह परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शास्त्रज्ञांद्वारे वेगवेगळ्या थेरपींचा शोध घेतला जात आहे. ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे आता कोरोनातून पूर्णपणे मुक्त होण्याची नवी आशा निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमधील ग्रिफिथ युनिव्हर्सिटीच्या मेंडीज हेल्थ इन्स्टिट्यूट आणि सिटी ऑफ होप रिसर्च अॅन्ड ट्रीटमेंट सेंटरने एक जबरदस्त थेरपी तयार केली आहे.
उंदरांमधील कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट
• जीन सायलेन्सिंग तंत्रज्ञानाने कोरोना विषाणूला पूर्णपणे नष्ट केले जाऊ शकते.
• शरीरात प्रवेश करणाऱ्या ९९% विषाणूंना आरएनए तंत्रज्ञानाद्वारे मुळापासून नष्ट केले गेले आहे.
• कोरोना विषाणू प्रयोगासाठी निवडलेल्या उंदरांच्या फुफ्फुसात पसरला होता, तो प्रयोगादरम्यान पूर्णपणे नष्ट करण्यात आला.
• या तंत्रज्ञामुळे कोरोनाच नाही तर भविष्यात अशा विविध प्रकारच्या कोणत्याही विषाणूचा किंवा त्यांच्या नवीन प्रकारांवरही उपचार करता येणार आहे.
जीन सायलेन्सिंग तंत्र
• ही थेरपी तयार करण्यासाठी, वैज्ञानिकांनी जनुकांना लक्ष्य करणारी जीन सायलेन्सिंग तंत्र वापरले आहे.
• नव्वदीच्या दशकात ऑस्ट्रेलियातील वनस्पतींमध्ये जीन सायलेन्सिंग तंत्राचा शोध लागला.
• या तंत्राद्वारे विषाणूच्या जीनोमला काढून टाकले जाते.
• या तंत्राने विकसित केलेले औषध केवळ ४ डिग्री सेल्सियस तापमानात साठवले जाऊ शकते.
• या तंत्राने बनविलेल्या इंजेक्शनमुळे ४ ते ५ दिवसात गंभीर रूग्ण बरे होतात. याचा परिणाम खूपच उत्साहवर्धक आहे.
• परंतु क्लिनिकल चाचण्या पूर्ण होण्यास दोन वर्षे लागू शकतात.
जीन सायलेन्सिंग तंत्राने थेट फुफ्फुसांमध्ये औषध
• या थेरपीला डायरेक्ट अॅक्टिंग अॅन्टी व्हायरल थेरपी म्हणून संबोधले जाते.
• थेरपी दरम्यान औषध लिपिड नॅनो पार्टिकलच्या माध्यमातून रुग्णाच्या फुफ्फुसांमध्ये सोडले जाते.
• रुग्णाच्या शरीरात कोरोनाचे विषाणू नष्ट करून हे औषध शरीरात किंवा फुफ्फुसात संसर्ग वाढण्यापासून रोखते.
• प्रतिरोधक पेशी विषाणू नष्ट करतात.
पाहा व्हिडीओ: