मुक्तपीठ टीम
सोमवारी राज्यातील ४२ हजार ३२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचवेळी २२ हजार १२२ नवे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात रविवारपेक्षा नव्या रुग्णांची संख्या ४ हजार ५५०ने घटली आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, महामुंबई, कोकण या पाच विभागांमधील नव्या रुग्णांची संख्या रविवारच्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा आज कमी झाली आहे. उत्तर महाराष्ट्र हा एकमेव भाग असा आहे जेथे आज नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात २२,१२२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४२,३२० रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज ३६१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण ३६१ मृत्यूंपैकी २७५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २३१ ने वाढली आहे.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५१,८२,५९२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.५१% एवढे झाले आहे.
- राज्यात आज एकूण ३,२७,५८० सक्रिय रुग्ण आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३२,७७,२९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,०२,०१९ (१६.८३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २७,२९,३०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २४,९३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०७,६६४ (कालपेक्षा घट)
- विदर्भ ०५,००१ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०२,७१३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ०३,२४५ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ०२,४६० (कालपेक्षा घट)
- कोकण ०१,०३९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
एकूण नवे रुग्ण २२ हजार १२२ (रविवारपेक्षा ४ हजार ५५० कमी)
कोरोना बाधित रुग्णांची महानगर, जिल्हानिहाय माहिती:
आज राज्यात २२,१२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५६,०२,०१९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका १०४९
२ ठाणे २५८
३ ठाणे मनपा १३२
४ नवी मुंबई मनपा १०४
५ कल्याण डोंबवली मनपा २१८
६ उल्हासनगर मनपा १४
७ भिवंडी निजामपूर मनपा २०
८ मीरा भाईंदर मनपा १४९
९ पालघर १२५
१० वसईविरार मनपा १७२
११ रायगड ३२८
१२ पनवेल मनपा १४४
ठाणे मंडळ एकूण २७१३
१३ नाशिक ६२३
१४ नाशिक मनपा ३४५
१५ मालेगाव मनपा ४
१६ अहमदनगर १९६५
१७ अहमदनगर मनपा ७०
१८ धुळे ६२
१९ धुळे मनपा २९
२० जळगाव ८६
२१ जळगाव मनपा ३१
२२ नंदूरबार ३०
नाशिक मंडळ एकूण ३२४५
२३ पुणे ग्रामीण १०५६
२४ पुणे मनपा ५४१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३८३
२६ सोलापूर ७८३
२७ सोलापूर मनपा ३६
२८ सातारा २४७०
पुणे मंडळ एकूण ५२६९
२९ कोल्हापूर ९३७
३० कोल्हापूर मनपा २७२
३१ सांगली १०४४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४२
३३ सिंधुदुर्ग ४५७
३४ रत्नागिरी ५८२
कोल्हापूर मंडळ एकूण ३४३४
३५ औरंगाबाद २२१
३६ औरंगाबाद मनपा १८६
३७ जालना २८८
३८ हिंगोली ७७
३९ परभणी २५८
४० परभणी मनपा २९
औरंगाबाद मंडळ एकूण १०५९
४१ लातूर १५६
४२ लातूर मनपा ३७
४३ उस्मानाबाद २८६
४४ बीड ८४०
४५ नांदेड ५५
४६ नांदेड मनपा २७
लातूर मंडळ एकूण १४०१
४७ अकोला ३६०
४८ अकोला मनपा १८९
४९ अमरावती ४२८
५० अमरावती मनपा १४०
५१ यवतमाळ १२४४
५२ बुलढाणा ११९०
५३ वाशिम २७१
अकोला मंडळ एकूण ३८२२
५४ नागपूर २१७
५५ नागपूर मनपा २७१
५६ वर्धा ९९
५७ भंडारा ४९
५८ गोंदिया १४८
५९ चंद्रपूर २०९
६० चंद्रपूर मनपा १०७
६१ गडचिरोली ७९
नागपूर एकूण ११७९
एकूण २२ हजार १२२
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ३६१ मृत्यूंपैकी २७५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २३१ ने वाढली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २४ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)