Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील विविध विषयांवर पालकमंत्र्यांनी घेतली बैठक

May 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
Aslam shaikh

मुक्तपीठ टीम

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई शहरातील विविध विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. विशेषतः तौक्ते वादळामुळे झालेले नुकसान, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी, शहरामध्ये सुरू असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण याबरोबरच पावसाळापूर्व करावयाची विविध कामे यांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह मुंबई महापालिकेच्या विविध झोनचे उपायुक्त, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यावेळी म्हणाले की, तौक्ते वादळामुळे शहरातील मच्छिमारांच्या बोटींच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात त्यांना मदत करण्याची कार्यवाही सुरू आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने सर्व पातळ्यांवर सुसज्जता करावी. शहरात सध्या लसीकरण सुरू असून लसीकरण केंद्रांवर कार्यालय किंवा इतर कोणत्याही प्रकारचे इतर उपक्रम सुरू ठेवू नयेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

 

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, शहरामध्ये मान्सूनपूर्व कामांची पूर्तता जलदगतीने करण्यात यावी, विशेषतः जिथे पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत तेथील राडारोडा हलविणे आदी कार्यवाही करण्यात यावी. कोस्टल रोड किंवा मेट्रोच्या कामामुळे पावसाळ्यात कुठे पाणी साचणार असेल तर अशा ठिकाणी पाणी साचू नये, यासाठीची व्यवस्था करण्यात यावी. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात पुरेशा आरोग्य सुविधांची उपलब्धता करणे, आयसीयू बेड्स, ऑक्सिजन बेड्स याबरोबरच पेडियाट्रिक ट्रीटमेंट सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात यावी. त्याचबरोबर कोरोनाविषयक मदतीसाठी शहरात प्रत्येक वॉर्डाकरिता सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकांना त्या त्या भागात व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

 

 


Tags: aslam shaikhEnvironment Minister Aditya Thackeraymumbaiअस्लम शेखतौक्ते चक्रीवादळपर्यटनमंत्री आदित्य ठाकरेमान्सूनपूर्व कामेमुंबई उपनगर
Previous Post

“मराठा आरक्षणासाठीच्या प्रत्येक मोर्चात भाजपाचा संपूर्ण सहभाग असेल”

Next Post

“विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी न खेळता परीक्षांबाबत भूमिका स्पष्ट करा”

Next Post
keshav upadhye

"विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी न खेळता परीक्षांबाबत भूमिका स्पष्ट करा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!