मुक्तपीठ टीम
‘अक्षय पात्र’ फाऊंडेशन या संस्थेकडून महाराष्ट्रातील रिलीफ फिडिंग मदतकार्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता पर्यंत देशभरात २ कोटींहून अधिक भोजनांची सुविधा देण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात ४७ लाखांहून अधिक भोजनांची सुविधा पुरवली आहे. शिजवलेले भोजन, फूड रिलीफ किट्स, हॅप्पीनेस किट्स आणि रेल यात्री फूड किट्सचे वाटप अशा अनेक प्रकाराने ‘अक्षय पात्र’ मदत करत आहे.
संपूर्ण देश कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना
‘अक्षय पात्र’ फाऊंडेशनने प्रतिकूल परिणाम झालेल्या गरजू लोकांना साह्य करण्यासाठी सरकारसोबत महाराष्ट्र राज्यात भोजन सुविधा देण्याचे प्रयत्न वाढवण्याचे ठरवले. त्यानुसार ‘अक्षय पात्र’ने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक व औरंगाबादमध्ये ४७ लाखांहून अधिक भोजनांची सुविधा दिली आहे. फाऊंडेशन शिजवलेले भोजन, फूड रिलीफ किट्ससह आवश्यक किराणा माल, हॅप्पीनेस किट्स, रेल यात्री फूड किट्सचा देखील पुरवठा करत आहे.
शिजवलेले भोजन किंवा किराणा मालाचे किट्सचे वाटप
- महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम ठाणे, पुणे व नागपूरमधील फाऊंडेशनच्या किचन्सच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे.
- सध्या काळाची गरज म्हणून ताजे शिजवलेले भोजन किंवा फूड रिलीफ किट्ससह आवश्यक किराणा माल गरजूंना देण्यात येत आहे.
- प्रत्येक फूड रिलीफ किटमध्ये ४२ भोजनांसाठी पुरेसा किराणा माल असण्यासोबत स्थानिक स्वादांनुसार साहित्य आहे.
- संस्था एमडीएम लाभार्थींना हॅप्पीनेस किट्स देखील देत आहे.
- प्रत्येक किटमध्ये २० भोजनांसाठी ड्राय रेशन, शैक्षणिक साहित्य व स्वच्छताविषयक उत्पादनांचा समावेश आहे.
- शाळा बंद असल्यामुळे मुले क्लासरूम व मध्यान्ह भोजनांपासून वंचित राहिली आहेत.
- हा उपक्रम घराघरांपर्यंत पोषण व शिक्षणाची सुविधा देण्याचा एक प्रयत्न आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी यात्री सेवा किट्स
- अक्षय पात्रने मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस व लोकमान्य टिळक टर्मिनस
- येथे स्थलांतरित लोकांना ५०,००० हून अधिक यात्री सेवा किट्सचे देखील वाटप केले आहे.
- या किट्समध्ये पाण्याची बाटली, चिक्की, नमकीन, ज्यूस,
- ताक, बिस्किटे आणि मास्कचा समावेश आहे.
- या उपक्रमाच्या माध्यमातून फाऊंडेशन प्रवास करणा-या १,२५,००० प्रवाशांपर्यंत पोहोचले.
चांगल्या दर्जाच्या भोजनाची सुविधा
पुण्यामध्ये अक्षय पात्र खडकी कन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटल येथील कोरोना रूग्ण व कर्मचारीवर्गाला भोजन देत आहे. पुण्यातील फोर आयटम मेन्यूमध्ये चपाती, भात, भाजी व डाळ यांचा समावेश आहे, तर सिंगल-आयटम मेनूमध्ये खिचडी किंवा बिर्याणी/पुलावचा समावेश आहे. नागपूरमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज – नागपूर, इंदिरा गांधी मेमोरिअल हॉस्पिटल आणि लता मंगेशकर हॉस्पिटलमधील रूग्ण व कर्मचारीवर्गाला शिजवलेल्या भोजनाची सुविधा दिली जात आहे.
देशभरात साडेबारा कोटी भोजन सुविधा
- मार्च २०२० पासून अक्षय पात्रने १९ राज्य व एका केंद्रशासित प्रदेशामधील वंचित लोकांना एकूण १२.५ कोटींहून अधिक भोजनांची सेवा दिली आहे.
- यामध्ये ६.१५ कोटी शिजवलेले भोजन, १०.२८ लाख आवश्यक किराणा माल किट्स (४ कोटींहून अधिक भोजन सुविधा) आणि १०.६९ लाख हॅप्पीनेस किट्ससह ड्राय रेशन (२ कोटींहून अधिक भोजन सुविधा), स्वच्छताविषयक उत्पादने व शैक्षणिक
साहित्याचा समावेश आहे.
पाहा व्हिडीओ: