मुक्तपीठ टीम
भारतीय लष्कराने त्यांच्या उड्डाण शाखेत महिला वैमानिकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिला वैमानिकांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण जुलैमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी सांगितले की, त्यांनी महिनाभरापूर्वीच सैन्याच्या उड्डाण शाखेत महिलांचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत.
सध्या महिलांना लष्कराच्या उड्डाण शाखेत केवळ एअर ट्रॅफिक कंन्ट्रोल आणि ग्राउंड ड्यूटी दिली जाते. आता मात्र वैमानिकपदी महिलांची भरती करता येईल असा निर्णय झाला आहे. आता महिला अधिकाऱ्यांना वैमानिक प्रशिक्षण दिले जाईल. एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर त्या वैमानिक म्हणून फ्रंट लाइनवर ड्युटी करण्यास सक्षम असतील.
पाहा व्हिडीओ: