मुक्तपीठ टीम
आज राज्यात २९ हजार ६४४ नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी ४४ हजार ४९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रात कालपेक्षा नव्या रुग्णांची संख्या किंचित कमी झाली असली, तरी महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, महामुंबई या चार विभागांमधील नव्या रुग्णांची संख्या गुरुवारच्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा आज वाढलेली दिसली. मुंबई मनपाच्या हद्दीत किंचित घट दिसली. त्याचवेळी फक्त विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात २९,६४४ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४४,४९३ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५०,७०,८०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५५५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ५५५ मृत्यूंपैकी ३६९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १८६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील ७०८ मृत्यू पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यू संख्येत करण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील एकूण मृत्यू संख्येत ७०८ ने वाढ झाली आहे. .
- आज रोजी एकूण ३,६७,१२१ सक्रिय रुग्ण आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२४,४१,७७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,२७,०९२ (१७.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २७,९४,४५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २०,९४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र १०,११५ (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ०५,७४१ (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ०४,८११ (कालपेक्षा वाढ)
- उ. महाराष्ट्र ०४,३७५ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०३,७८० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
- कोकण ००,८२२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
महाराष्ट्र एकूण २९ हजार ६४४ (कालपेक्षा २६७ ने घट)
कोरोना बाधित रुग्ण :
आज राज्यात २९,६४४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५५,२७,०९२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा १४१५
२ ठाणे २७९
३ ठाणे मनपा १७६
४ नवी मुंबई मनपा १४४
५ कल्याण डोंबवली मनपा २००
६ उल्हासनगर मनपा १८
७ भिवंडी निजामपूर मनपा १३
८ मीरा भाईंदर मनपा १४९
९ पालघर ४५४
१० वसईविरार मनपा २२६
११ रायगड ५८८
१२ पनवेल मनपा ११८
ठाणे मंडळ एकूण ३७८०
१३ नाशिक ८९०
१४ नाशिक मनपा ४०१
१५ मालेगाव मनपा ५
१६ अहमदनगर २०६५
१७ अहमदनगर मनपा २२२
१८ धुळे ११२
१९ धुळे मनपा १०९
२० जळगाव १४०
२१ जळगाव मनपा ३४६
२२ नंदूरबार ८५
नाशिक मंडळ एकूण ४३७५
२३ पुणे ग्रामीण २२९१
२४ पुणे मनपा १०७८
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६९१
२६ सोलापूर १५५२
२७ सोलापूर मनपा ८५
२८ सातारा १७९०
पुणे मंडळ एकूण ७४८७
२९ कोल्हापूर १००५
३० कोल्हापूर मनपा २६१
३१ सांगली १२०२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १६०
३३ सिंधुदुर्ग २९१
३४ रत्नागिरी ५३१
कोल्हापूर मंडळ एकूण ३४५०
३५ औरंगाबाद ३९७
३६ औरंगाबाद मनपा ४८०
३७ जालना ३३३
३८ हिंगोली १५०
३९ परभणी ३१७
४० परभणी मनपा २७
औरंगाबाद मंडळ एकूण १७०४
४१ लातूर २९९
४२ लातूर मनपा २०४
४३ उस्मानाबाद १८१२
४४ बीड ७११
४५ नांदेड ६६
४६ नांदेड मनपा १५
लातूर मंडळ एकूण ३१०७
४७ अकोला ४३०
४८ अकोला मनपा १८८
४९ अमरावती ७८८
५० अमरावती मनपा २०८
५१ यवतमाळ ४७१
५२ बुलढाणा ९५३
५३ वाशिम ३८६
अकोला मंडळ एकूण ३४२४
५४ नागपूर ५३०
५५ नागपूर मनपा ४३९
५६ वर्धा ३७७
५७ भंडारा १०४
५८ गोंदिया १२६
५९ चंद्रपूर ३९०
६० चंद्रपूर मनपा ११७
६१ गडचिरोली २३४
नागपूर एकूण २३१७
इतर राज्ये /देश ०
एकूण २९ हजार ६४४
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ५५५ मृत्यूंपैकी ३६९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १८६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील ७०८ मृत्यू पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यू संख्येत करण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील एकूण मृत्यू संख्येत ७०८ ने वाढ झाली आहे. .
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २१ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.