मुक्तपीठ टीम
एनआयआर कोट्यात प्रवेश घेण्यासाठी पैसे भरण्यासाठी सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन या नावाने बनावट ऑनलाइन पोर्टल बनवणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी केलेल्या घोटाळ्याचा हवाला देत पोलीस एसआययूने केलेल्या तक्रारीची चौकशी करत आहेत.
डिजिटल वापरकर्त्यांची फसवणूक करण्याचे नवीन आणि धूर्त मार्ग सतत वापरतात, यामुळे सायबर क्राइम सतत वाढत चालला आहे. आणि आता, शहरातील शिक्षण क्षेत्रात मोठे नाव असणरे हे कॅालेज ऑनलाइन गुन्हेगारांनी लबाडीच्या योजनेला बळी पाडले आहे. सिंबायोसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन (एसएमसीडब्ल्यू) ने पुणे सायबर क्राइम सेलकडे त्यांच्या मूळ साइटशी अगदीच अनोळखी दिसणारी बनावट वेबसाइटबद्दल तक्रार अर्ज दाखल केला आणि महाविद्यालयातील प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांकडून प्रवेश घेण्यासाठी पैसे भरण्यासाठी दिशाभूल केली जात आहे. असे कळवण्यात आले.
इच्छुकांना बॅचलर प्रवेशासाठी मॅनेजमेंट आणि एआरआय(अनिवासी भारतीय) प्रवर्गातील रिक्त जागांसाठी अर्ज भरण्याचे सांगून फसवे ईमेल आयडी, admissions@smchedu.com वरून ईमेल पाठवत असल्याचे नमूद केले आहे.
संस्थेने कन्फर्म केले की, सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रवेश पूर्ण झाले आहेत, अनिवासी भारतीय (NRI) प्रवर्गातील प्रवेश अजूनही सुरू आहेत आणखी दोन दिवस ते सुरू असेल सांगण्यात आले.
सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू आणि सिम्बायोसिसचे मुख्य संचालक डॉ. विद्या येरावडेकर यांनी दुजोरा केला की, “होय, आमच्या मेडिकल कॉलेजच्या डोमेनची प्रतिकृती म्हणजे एक फसवणूकीची वेबसाइट आहे. एका विद्यार्थ्याच्या पालकांनी आम्हाला याची माहिती दिली. आम्हाला आमच्या इतर कर्मचार्यांद्वारे वेबसाइटबद्दल देखील माहिती मिळाली आणि त्वरित खबरदारीची नोटीस प्रकाशित केली आणि आम्ही सायबर क्राईम सेलकडे तक्रार केली. ”
त्या पुढे म्हणाल्या, “आत्तापर्यंत कोणतेही आर्थिक गैरवर्तन झाल्याची नोंद झालेले नाही आणि आमच्या सर्व सामान्य वर्गातील प्रवेश आधीच पूर्ण झालेले आहेत. सध्या एनआरआय प्रवर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आमच्याकडे एक अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय आहे ज्यामध्ये संपूर्ण विनामूल्य सुविधा आहे आणि कमी शुल्कात वैद्यकीय अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहे. या बनावट वेबसाइटचे कारण हे घडले आहे. आम्ही वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही प्रकारचे देणगी घेत नाही, म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना स्पष्ट केले आहे की, त्यांनी अशा कोणत्याही बनावट वेबसाइट्सचे बळी पडू नये. ”
एसआययूचे उपनिबंधक डॉ. अविनाश रोहिदास काकडे यांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या सिम्बायोसिस चेतावणी नोटीस पुढील वाचनात आले आहे की, एसआययूने एसएमसीडब्ल्यूच्या वतीने अर्ज मागवण्यासाठी कोणतीही वैयक्तिक / एजन्सी / संस्था नेमलेली नाही. या व्यक्तींनी अनधिकृत व बेकायदेशीर गुन्हेगारी कृत्य केले आहे. त्यांनी आमच्या संकेतस्थळ www.smchedw.com सारख्या दिसणाऱ्या www.smchedu.com या नावाने फसवी वेबसाइट आयोजित केली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाने उमेदवारांना अशा ई-मेलद्वारे प्रेरित होऊ नये.
पुणे ग्रामीण पोलिसांशी संबंधित सायबर क्राईम सेलकडे तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांना तपास सुरू असल्याचे सांगितले. या संबंधित पोलीस अधिकारी भरत मोहोळ यांनी सांगितले की, “वैद्यकीय महाविद्यालयाकडून तक्रार पत्र आल्यानंतर चौकशी सुरू केली आहे. आम्ही डोमेनला पत्र लिहून उत्तर मागितला आहे. चौकशी सुरू झाली असून त्याच आधारे कारवाई केली जाईल. “