मुक्तपीठ टीम
खासदार संभाजी छत्रपती यांनी आपला करारी बाणा दाखवला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी आपण चारवेळा प्रयत्न केला. भाजपाने मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नये”, असे स्पष्ट शब्दात बजावत “मी भाजपाचा ठेका घेतला नाही,” असेही त्यांनी सुनावले आहे. नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलताना ते खासदार म्हणून कमी पण छत्रपतींच्या करारी बाण्याने रोखठोकच जास्त बोलले. तसेच २७ मे रोजी मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडल्यानंतर माझं-तुझं केलं तर बघा, असा इशाराही त्यांनी आमदार आणि खासदारांना दिला आहे.
संभाजी छत्रपतींचा करारी बाणा
• भाजपाने मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये.
• भाजपाने आता यावर तोडगा सांगावा.
• मराठा समाजाला न्याय कसा मिळवून देऊ शकतो, यासंबंधी भाजपाने बोलावे. त्यांची भूमिका त्यांनी बघावी. मी काय त्यासाठी ठेका घेतलेला नाही.
• मागच्या सरकारने बोगस कायदा केला की आताच्या सरकारने योग्य मांडणी केली नाही याच्याशी आम्हाला काही देणं-घेणं नाही.
• राज्य आणि केंद्रात आरोप प्रत्योराप सुरु असून एकमेकांवर जबाबदारी झटकत आहेत.
• मराठा समाजाची दिशाभूल कराल तर हा संभाजी महाराज आडवा येईल, अशा शब्दात संभाजी छत्रपतींनी भूमिका मांडली.
तज्ज्ञांशी चर्चा करणार
• २७ तारखेला भूमिका मांडणार.
• माझी भूमिका ही सकारात्मक असेल.
• “मी छत्रपती शिवाजी महाराजांची, राजर्षी शाहू महाराजांची आणि समाजाची भूमिका मांडत असतो.
• “माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेकजण आहेत.
• मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल
• त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे.
• महाराष्ट्र फिरुन पुन्हा एकदा भावना समजून घेणार आहे.
• येत्या २७ तारखेला मुंबईत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा करणार आहे.
• या चर्चेनंतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका मांडणार.
• पण यानिमित्ताने मला सर्व आमदार आणि खासदारांना सांगायचं आहे की, समाजाची भावना मांडल्यानंतर माझं तुझं केलं तर बघा!